Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : भारतीय जनता पक्षाचा विकासवेधी विचार समाजातील तळागाळापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने, कालसुसंगत पावले उचलली जात आहेत. त्यानुसार रविवारी (ता. ०४) जाहीर केलेल्या नवीन जम्बो कार्यकारिणीत पूर्व हवेलीतील विविध क्षेत्रात व भाजपात अनेक वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना तालुका कार्यकारणीमध्ये संधी देण्यात आली आहे.
भाजपाचे हवेली तालुकाध्यक्ष शामराव परीलाल गावडे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हवेली तालुका उपाध्याक्षपदी तब्बल ९ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरचिटणीस व चिटणीस असे ७ जनांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध आघाडीच्या अध्यक्षपदी १० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, भाजपा पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, पुणे जिल्हा भाजपा मोर्चाच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, यांच्या हस्ते उपस्थितांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा सारिका लोणारी, पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप बाबा सातव, महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे भाजपा अध्यक्ष संदीप भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे, हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे, शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, आदींच्या उपस्थितीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे :-
हवेली तालुका उपाध्यक्ष :- राहुल बाबासाहेब शिंदे, नितीन दत्तात्रय गावडे, विकास किसान चौधरी, गणेश तात्याबा सातव, योगेश दत्तात्रय जगताप, विनायक अर्जुन कोतवाल, सुभाष अनंता कुंजीर, सुनिल अंकुश तुपे, देविदास बाळासो गायकवाड
सरचिटणीस :- गणेश बाळासाहेब चौधरी, विजय अनिलराव जाचक, दिनेश नामदेव झांबरे, दिनेश नामदेव झांबरे, स्वप्निल दत्तात्रय उंद्रे,
चिटणीस :- सुशिल पोपट चौधरी, अशोक बबन भोरडे, प्रसाद शंकर तळेकर,
इतर कार्यकारणी : – उरुळी कांचन शहराध्यक्ष – अमित सतिश कांचन, युवा मोर्चा अध्यक्ष – दत्ताआबा मारुती हरगुडे, किसान मोर्चा अध्यक्ष- गुरुनाथ हनुमंत मचाले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष – संतोष नारायण कंचे, सोशल मिडिया अध्यक्ष – सोमनाथ माणिक कोतवाल, सहकार आघाडी संयोजक – कृषिराज दत्तात्रय चौधरी, व्यापार आघाडी संयोजक – संदीप हरिभाऊ गावडे, कायदा आघाडी संयोजक – भाऊसाहेब शिंदे, मच्छीमार आघाडी संयोजक – बाळासाहेब हिरामण मलाव, वैद्यकीय आघाडी संयोजक – डॉ. विठ्ठल गुलाबराव सातव, उत्तर भारतीय आघाडी संयोजक – मृत्यंजय कुमार सिंह, अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ संयोजक – शरद मुरलीधर खेडेकर, ग्रामविकास व पंचायत राज संयोजक – अक्षय ज्ञानेश्वर वाळके, फ्रेंड्स ऑफ बी. जे. पी आघाडी संयोजक – बबनराव आबुराव गायकवाड, रेल्वे प्रवासी आघाडी संयोजक – आबासाहेब दशरथ चव्हाण.