Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात गणेश उत्सवानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने खाद्यभ्रमंती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
फेस्टिवलमध्ये १००पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग
या फेस्टिवलमध्ये १००पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. (Uruli Kanchan) ढोकळा, इडली, लस्सी, नाचणी, आंबील, ताक, जिलेबी, दहीभात, कढी, म्हैसूर भजी, विविध प्रकारचे केक आदी पदार्थांचे २५ स्टॉल लावण्यात आले होते.
यामध्ये प्रथम क्रमांक हा अवंती जाधव ग्रुप, द्वितीय क्रमांक निकिता जाधव ग्रुप, तृतीय क्रमांक – साहिल खेडेकर ग्रुप आणि प्रांजली यादव ग्रुप, चतुर्थ क्रमांक – सुप्रिया थडके ग्रुप, उत्तेजनार्थ – विवेक साळुंखे ग्रुप आणि प्रतीक्षा मूल्या ग्रुप यांनी मिळविले. (Uruli Kanchan) या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुजाता गायकवाड, सौरभ साबळे, डॉ. अमोल बोत्रे, अनुप्रिता भोर, प्रणिता फडके, वैशाली चौधरी, मोरेश्वर बगाडे यांनी केले.
या कार्यक्रमाला खाद्यभ्रमंती समन्वयक म्हणून प्रा. विजय कानकाटे, कार्यालयीन अधीक्षक प्रदीप राजपूत, सांस्कृतिक विभाग प्रमुख शुभांगी रानवडे यांनी काम पाहिले. (Uruli Kanchan) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत, उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर, डॉ. समीर आबनावे, डॉ. निलेश शितोळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.