Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या 18 विद्यार्थ्यांना मानाचा ‘स्काऊट गाईड राज्य पुरस्कार’ जाहीर, कठोर परिश्रमानंतर आता ‘राष्ट्रपती पुरस्कारा’कडे वाटचाल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 11 April 2026, 9:37
Uruli Kanchan

photo- ppn

Uruli Kanchan : येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या स्काऊट गाईड पथकाने राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. भारत स्काऊट गाईड राज्य कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या अत्यंत कठीण अशा राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात विद्यालयाचे 18 विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यांना राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

भारत स्काऊट गाईड राज्य कार्यालयामार्फत दरवर्षी या चाचणी शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी झालेल्या विविध सत्रांमधील निकालात स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या दुसऱ्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. स्काऊट गाईड विभागात 12 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत झालेल्या चाचणीत आशिष रणदिवे, यशराज थोरात, विश्व जवळकर, यश कापणे, सिद्धांत शिंगे आणि उत्कर्ष किर्वे या 6 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

गाईड विभागात 16 ते 19 जानेवारी 2026 दरम्यान झालेल्या परीक्षेत स्वराली फडतरे, संस्कृती म्हेत्रे, स्वरा वलटे, अंतरा बगाडे, अक्षरा कदम, सिद्धी ढवळे, सिद्धी ठुले, सिद्धी शिवरकर, कार्तिकी काकडे, समृद्धी त्र्यंबके, कार्तिकी कामठे आणि स्वरांजली गुंजाळ अशा 12 विद्यार्थिनींनी बाजी मारली.

या राज्य पुरस्कार परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना स्काऊट शिक्षक नागेश काळभोर तसेच गाईड शिक्षिका दिपाली शिर्के व सुवर्णा कानडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यालयाची ही दुसरीच बॅच असून, शंभर टक्के विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार मिळवण्याची परंपरा कायम राखली आहे. या ऐतिहासिक यशानंतर स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे ट्रस्टी मेंबर, प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.

 

दरम्यान, या विद्यार्थ्यांची आता पुढील ध्येय असणाऱ्या सर्वोच्च ‘राष्ट्रपती पुरस्कार’ परीक्षेसाठी तयारी सुरू झाली असून, त्यासाठी त्यांना मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या यशाबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केले असून विद्यालयाच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाचे कौतुक होत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Wednesday, 5 August 2026, 22:44

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Wednesday, 5 August 2026, 20:37
Next Post

खळबळजनक! सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांपासून धोका? भोंदू अशोक खरातच्या चौकशीत समोर आलं भलतंच कनेक्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.