Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 August 2026, 20:37

पुणे : येत्या 15 ऑगस्ट 2026 रोजी देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व माध्यमांच्या सरकारी तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये देशभक्तीपर वातावरणात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुमारे 20 मिनिटांचे सामूहिक कवायत संचलन (ड्रिल परेड) आयोजित केले जाईल.

विविध स्पर्धा आणि प्रभातफेरीचे आयोजन:

शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, संविधानाच्या सरनाम्याचे वाचन आणि देशभक्तीपर गीतांचे गायन करून परिसरात प्रभातफेरी काढली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुढील विविध उपक्रम व स्पर्धा घेतल्या जातील:

सांस्कृतिक स्पर्धा: स्वातंत्र्यसेनानी आणि लोकशाही विषयांवर भाषण स्पर्धा, देशभक्तीपर कविता वाचन व नृत्य स्पर्धा.

 

कला व क्रीडा उपक्रम: देशभक्तीवर आधारित चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या हस्तकलांचे प्रदर्शन आणि खेळांचे आयोजन.

शाळांमध्ये आयोजित कवायत संचलनाचे फोटो आणि व्हिडिओ अपडेट करण्यासाठी ‘स्कूल पोर्टल’वर मुख्याध्यापकांच्या लॉगिनमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या कार्यक्रमाचा एक व्यावसायिक माहितीपट आणि डिजिटल अहवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्याद्वारे शासनाला सादर केला जाणार आहे.

मागील शैक्षणिक वर्षातही 15 ऑगस्ट 2025 आणि 26 जानेवारी 2026 रोजी अशाच प्रकारे कवायत संचलनाचा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबवण्यात आला होता. त्याच धर्तीवर यंदाचा स्वातंत्र्यदिनही अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व शिक्षण संचालकांनी शाळांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देऊन प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

Wednesday, 14 October 2026, 23:00

वरकुटे बुद्रुकमध्ये चोरट्यांचा डल्ला! घरातून १.३० लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास; चोरट्याविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 14 October 2026, 22:21

अन् मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या नगरसेवकांना झाप-झाप झापलं! देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर; म्हणाले “मी सगळ्यांचं रिपोर्टकार्ड…

Wednesday, 14 October 2026, 19:53

जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच दिला धोका! पुण्यात घरकाम करण्याऱ्या महिलेचा कारनामा; संधी साधत कपाटातून..

Wednesday, 14 October 2026, 19:39

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पदोन्नती प्रक्रियेतला अडथळा झाला दूर; ‘ती’ अट झाली रद्द

Wednesday, 14 October 2026, 19:35

पुणे जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास सक्त मनाई! दुष्काळामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा आणि कडक निर्णय

Wednesday, 14 October 2026, 19:27
Next Post

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp