Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 14 October 2026, 23:00

पुणे : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ४,४६२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आयोजित करण्यात आली आहे. या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आता २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रमाणपत्रांच्या ऑनलाइन पडताळणीत येणाऱ्या अडचणी आणि अर्जदारांच्या विनंतीचा विचार करून मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

या सोडतीसाठी आतापर्यंत १ लाख ६७ हजार ५७० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १ लाख ४ हजार ८६ अर्ज अनामत रकमेसह दाखल झाले आहेत. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सुरू झाली होती.

१५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी मांजरी खुर्द, म्हाळुंगे आणि भूगाव येथे सदनिका उपलब्ध आहेत.

२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे शहरातील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबवेवाडी, मुंढवा, उंड्री, वडगाव, बावधन आणि कोंढवा खुर्द या भागांतील घरांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात मोशी, किवळे, डुडुळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव येथे सदनिका उपलब्ध आहेत.

अर्जदारांनी IHLMS 2.0 प्रणालीवर अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची आणि उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी MahaIT मार्फत केली जाते. तसेच आयकर विवरणपत्राची पडताळणी आयकर विभागाकडून ऑनलाइन केली जाते. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने यापूर्वी अर्जाची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

मात्र, अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची पडताळणी करताना अडचणी येत असल्याने काही अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. सध्या ३,८७२ अधिवास प्रमाणपत्रे आणि ९,१४२ उत्पन्नाचे दाखले पडताळणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अर्जदारांना आणखी वेळ मिळावा, यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

TCS धर्मांतर प्रकरणात राजकीय कनेक्शन? इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश

Friday, 6 November 2026, 8:54

सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त आजच! पण 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव माहिती आहे का? पाहा आजचे दर

Friday, 6 November 2026, 8:40

सोन्यातही भेसळ! दिसायला अस्सल, पण मिसळलेत ‘हे’ धातू; ऐन सणासुदीत विकलं जातंय भेसळयुक्त सोनं

Friday, 6 November 2026, 8:32

Pune News: नूडल्स आणि सुकामेव्याच्या पाकिटांत लपवला कोट्यवधींचा माल; पाकिटं उघडताच कस्टम अधिकारीही चक्रावले

Friday, 6 November 2026, 8:19

एसटीच्या महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! NCMC कार्ड नसतानाही मिळणार सवलत, पण फक्त ‘या’ तारखेपर्यंत

Friday, 6 November 2026, 8:10

पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीला अटक; ‘तो जिवंत आहे’ म्हणताच मनोरुग्णालयात धाडलं, 4 वर्षांनी DNA रिपोर्टने उडवली खळबळ

Friday, 6 November 2026, 7:59
Next Post

Daily Horoscope: आज ग्रह देणार साथ की वाढवणार अडचणी? मेष ते मीन, जाणून घ्या 12 राशींचे संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp