Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: नूडल्स आणि सुकामेव्याच्या पाकिटांत लपवला कोट्यवधींचा माल; पाकिटं उघडताच कस्टम अधिकारीही चक्रावले

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 6 November 2026, 8:19

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाच्या सामानातून तब्बल 3 कोटी 72 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, हा गांजा लपवण्यासाठी नूडल्स आणि सुकामेव्याच्या पाकिटांचा वापर करण्यात आला होता. कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली असून संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

ही घटना 4 नोव्हेंबर रोजी घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-291 या विमानातून एक भारतीय प्रवासी बँकॉकहून पुण्यात दाखल झाला होता. विमानतळावर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी त्याच्या ट्रॉली बॅगेची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला बॅगेत नूडल्सची पाकिटे आणि ‘फ्रीज ड्राय मंथोंग ड्युरियन’ नावाने असलेली सुकामेव्याची 9 पाकिटे आढळली. मात्र, या पाकिटांची बारकाईने तपासणी केली असता त्यामध्ये काहीतरी वेगळेच दडवण्यात आल्याचे समोर आले. खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये काळ्या प्लास्टिकचे दोन थर लावून त्यात व्हॅक्यूम सील केलेल्या पिशव्या लपवण्यात आल्या होत्या.

या पिशव्यांमध्ये पिवळसर-हिरव्या रंगाच्या वाळलेल्या फुलांच्या कळ्या आढळल्या. त्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी अमली पदार्थ तपासणी किटच्या मदतीने त्यांची चाचणी केली. त्यातून हा पदार्थ हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

या कारवाईत एकूण 10.642 किलो गांजा आणि तस्करीसाठी वापरलेले पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत सुमारे 3 कोटी 72 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी प्रवाशाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कस्टम विभागाचे पोलीस उपायुक्त धीरज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; नियम मोडल्यास होणार कारवाई

Saturday, 7 November 2026, 9:37

राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौरांनी महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला; पुणे महापालिका आवारातील प्रकार

Saturday, 7 November 2026, 9:30

पुण्यात सराफाला मोठा गंडा! कामगाराने 45 लाखांचा ऐवजवर मारला डल्ला

Saturday, 7 November 2026, 9:19

Maharashtra Weather: राज्यात थंडीची चाहूल की उन्हाचा कहर? मुंबईपासून विदर्भापर्यंत आज कसं असेल हवामान? जाणून घ्या

Saturday, 7 November 2026, 8:31

Daily Horoscope: दिवाळीच्या आनंदात आणखी भर! ‘या’ राशींना मिळणार नोकरी-व्यवसायात यश; पाहा 7 नोव्हेंबरचे भविष्य!

Saturday, 7 November 2026, 8:14

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे मेट्रोच्या वेळेत बदल; संध्याकाळी ६ नंतर सेवा राहणार बंद

Friday, 6 November 2026, 23:00
Next Post

सोन्यातही भेसळ! दिसायला अस्सल, पण मिसळलेत 'हे' धातू; ऐन सणासुदीत विकलं जातंय भेसळयुक्त सोनं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp