Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीला अटक; ‘तो जिवंत आहे’ म्हणताच मनोरुग्णालयात धाडलं, 4 वर्षांनी DNA रिपोर्टने उडवली खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 6 November 2026, 7:59

कल्याण: पती बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या एका महिलेच्या आयुष्यात पुढे अनेक धक्कादायक घटना घडल्या. पतीच्या मृत्यूच्या प्रकरणात तिलाच आरोपी करण्यात आले. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि नंतर मनोरुग्णालयात पाठवल्याचाही आरोप या महिलेने केला आहे. मात्र, तब्बल 4 वर्षांनंतर मिळालेल्या DNA अहवालामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. संबंधित मृतदेह महिलेच्या पतीचा नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सुरुवात सप्टेंबर 2022 मध्ये झाली. शुभांगी (नाव बदलले आहे) या पती बेपत्ता असल्याची  तक्रार देण्यासाठी नवघर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. 19 सप्टेंबर रोजी त्यांनी पती घर सोडून गेल्याची तक्रारही दिली. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि त्यांच्याशी वाद झाल्यानंतर मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेला अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खाडीत एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले. पतीच्या भावाने या मृतदेहाची ओळख पटवून तो आपल्या भावाचाच असल्याचे सांगितले. त्यानंतर शुभांगी यांच्यावर पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा मृतदेह पतीचा नसल्याचे त्या सातत्याने सांगत होत्या.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पतीच्या भावाचे आणि मुलाचे DNA नमुने घेण्यात आले होते. तब्बल 4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुभांगी यांना DNA तपासणीचा अहवाल मिळाला. या अहवालातील निष्कर्षामुळे संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले. खाडीत आढळलेला मृतदेह त्यांच्या पतीचा नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्याचे समोर आले. त्यामुळे सुरुवातीपासून पती जिवंत असल्याचा दावा करणाऱ्या नम्रता यांच्या म्हणण्याला महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर मृतदेह पतीचा नसल्याचे समोर आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आता शुभांगी यांनी न्यायालयात धाव घेतली असून बेपत्ता पतीचा शोध घेण्यासह त्याचा भाऊ, वहिनी आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आरोपांवर पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News: नूडल्स आणि सुकामेव्याच्या पाकिटांत लपवला कोट्यवधींचा माल; पाकिटं उघडताच कस्टम अधिकारीही चक्रावले

Friday, 6 November 2026, 8:19

एसटीच्या महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कार्ड नसतानाही मिळणार सवलत, पण फक्त ‘या’ तारखेपर्यंत

Friday, 6 November 2026, 8:10

पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीला अटक; ‘तो जिवंत आहे’ म्हणताच मनोरुग्णालयात धाडलं, 4 वर्षांनी DNA रिपोर्टने उडवली खळबळ

Friday, 6 November 2026, 7:59

दिसायला चांदी, पण प्रत्यक्षात ॲल्युमिनियम! मिठाईवरील चमकणारा वर्ख ठरू शकतो घातक; FDA च्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Friday, 6 November 2026, 7:43

धनत्रयोदशीला महाराष्ट्रात पावसाचं संकट? कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Friday, 6 November 2026, 7:27

Daily Horoscope: धनत्रयोदशीला शुक्राची जादू! 6 नोव्हेंबरपासून या 5 राशींचे नशीब चमकणार, पैशांचा पडणार पाऊस!

Friday, 6 November 2026, 7:18
Next Post

एसटीच्या महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कार्ड नसतानाही मिळणार सवलत, पण फक्त 'या' तारखेपर्यंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp