Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिसायला चांदी, पण प्रत्यक्षात ॲल्युमिनियम! मिठाईवरील चमकणारा वर्ख ठरू शकतो घातक; FDA च्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 6 November 2026, 7:43

मुंबई : दिवाळीचा सण जवळ आल्याने बाजारपेठांमध्ये मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांमध्ये विविध प्रकारच्या मिठाया विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत. विशेषतः चांदी आणि सोन्याचा वर्ख लावलेल्या मिठायांकडे अनेकांचा कल असतो. मात्र, अशा मिठाईची खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण, मिठाईवरील चांदीच्या वर्खाच्या नावाखाली अॅल्युमिनियमचा वापर होत असल्याचे तपासणीत समोर आले आहे.

काही नमुन्यांच्या तपासणीत वर्खामध्ये चांदीचे प्रमाण शून्य, तर अॅल्युमिनियमचे प्रमाण तब्बल 99 टक्क्यांपर्यंत आढळल्याची माहिती समोर आली आहे. बनावट सोन्याच्या वर्खामध्ये तांबे आणि जस्त यांसारखे धातू असण्याची शक्यता आहे. काही नमुन्यांमध्ये कॅडमियमसारखे विषारी घटकही आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आकर्षक दिसणाऱ्या मिठाईमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. बनावट वर्ख वापरणाऱ्या मिठाई विक्रेत्यांवर प्रशासनाचे लक्ष असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मिठाईवरील वर्खाची तपासणी करताना तो हाताळल्यावर त्याचे काय होते, याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. चांदीचा वर्ख हातात घेतल्यावर विरघळण्याऐवजी त्याची फॉईल तयार होत असेल, तर तो अॅल्युमिनियमचा असण्याची शक्यता असते. मात्र, केवळ या पद्धतीवरून वर्खाची शुद्धता निश्चित करता येत नाही.

सणाच्या काळात मिठाई खरेदी करताना परवानाधारक दुकानांची निवड करा. योग्य लेबल असलेले पदार्थ घ्या आणि संशयास्पद मिठाई खरेदी करणे टाळा. सणाचा गोडवा वाढवताना आरोग्य धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

TCS धर्मांतर प्रकरणात राजकीय कनेक्शन? इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश

Friday, 6 November 2026, 8:54

सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त आजच! पण 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव माहिती आहे का? पाहा आजचे दर

Friday, 6 November 2026, 8:40

सोन्यातही भेसळ! दिसायला अस्सल, पण मिसळलेत ‘हे’ धातू; ऐन सणासुदीत विकलं जातंय भेसळयुक्त सोनं

Friday, 6 November 2026, 8:32

Pune News: नूडल्स आणि सुकामेव्याच्या पाकिटांत लपवला कोट्यवधींचा माल; पाकिटं उघडताच कस्टम अधिकारीही चक्रावले

Friday, 6 November 2026, 8:19

एसटीच्या महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! NCMC कार्ड नसतानाही मिळणार सवलत, पण फक्त ‘या’ तारखेपर्यंत

Friday, 6 November 2026, 8:10

पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीला अटक; ‘तो जिवंत आहे’ म्हणताच मनोरुग्णालयात धाडलं, 4 वर्षांनी DNA रिपोर्टने उडवली खळबळ

Friday, 6 November 2026, 7:59
Next Post

पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीला अटक; 'तो जिवंत आहे' म्हणताच मनोरुग्णालयात धाडलं, 4 वर्षांनी DNA रिपोर्टने उडवली खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp