Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे: जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघाला असून, बुधवारी यवतमध्ये अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सोहळ्याचे आगमन झाले. गळ्यात वीणा, हातात भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत हजारो वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

पंढरपूर येथील नगरप्रदक्षिणा पूर्ण करून 29 जुलै रोजी पालखीने परतीचा मार्ग धरला होता. 4 ऑगस्ट रोजी वरवंड येथील मुक्काम संपवून, सकाळी आरती झाल्यानंतर सोहळ्याने देहूच्या दिशेने प्रस्थान केले. त्यानंतर सकाळी साधारण 10.30 च्या सुमारास पालखी यवत येथे पोहोचली. यवतकरांनी वारकऱ्यांचे आणि पालखीचे अत्यंत आदराने व उत्साहाने स्वागत केले.

दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी सोहळा यवत येथील ऐतिहासिक श्री काळभैरवनाथ मंदिरात थांबला होता. या वेळी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. यवत येथे वारकऱ्यांसाठी चपाती, भाजी आणि इतर विविध अन्नपदार्थांच्या महाप्रसादाचे मोफत वाटप करण्यात आले. मंदिर परिसर आणि आसपासच्या भागात वारकऱ्यांनी काही वेळ विश्रांती घेतली.

दुपारी सुमारे 1.00 वाजता पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी देहूकडे रवाना झाला. या प्रसंगी श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे कार्यकर्ते आणि नागरिक पालखीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पुढील मुक्कामाचे नियोजन: यवत येथून निघालेला हा पालखी सोहळा रात्री कुंजीरवाडी येथे मुक्कामी थांबणार आहे. त्यानंतर 6 आणि 7 ऑगस्ट रोजी सोहळ्याचा मुक्काम नवी पेठ येथील श्री विठ्ठल मंदिरात असणार आहे. 8 ऑगस्ट रोजी पालखी पिंपरी गावात मुक्काम करेल. शेवटी, रविवार 9 ऑगस्ट रोजी हा पवित्र पालखी सोहळा आपल्या मूळ स्थानी म्हणजेच श्री क्षेत्र देहू येथे पोहोचेल.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp