Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आई तुझा मित्र मला तिथं हात लावतो’ मुलीनं घाबरत सांगितलं पण आईनं झिडकारलं; वडिलांना कळताच पायाखालची जमीन….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 28 August 2026, 12:42

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड परिसरात नात्याला आणि विश्वासाला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या मित्रानेच ओळखीचा गैरफायदा घेत तिच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगूनही आईने मित्राचीच बाजू घेत मुलीला गप्प केले. अखेर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील २०१८ पासून विभक्त राहत असून त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. १३ वर्षीय पीडित मुलगी इयत्ता सातवीत शिकत असून ती आपल्या आईसोबत राहते. १५ जून रोजी आईचा एक मित्र त्यांच्या घरी आला होता. आई घरात उपस्थित असतानाच या नराधमाने चिमुकलीला जवळ घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य केले आणि अयोग्य वक्तव्ये केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली.

घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला घडलेला सर्व प्रसंग सांगितला. मात्र, आईने आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याऐवजी, तो माझा मित्र आहे, त्याच्याबाबत काही बोलू नकोस, असे सांगून मुलीचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. जन्मदात्रीनेच आरोपीची पाठराखण केल्यामुळे मुलगी अधिकच खचली. अखेर असहाय्य झालेल्या या मुलीने तिच्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य आणि विकृती लक्षात घेत वडिलांनी तातडीने १८ ऑगस्ट रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली.

वडिलांच्या फिर्यादीवरून चिंचवड पोलिसांनी आरोपी मित्राविरोधात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक आणि सखोल तपास करत आहेत. स्वतःच्या मुलीवर अत्याचार होत असताना तिला न्याय मिळवून देण्याऐवजी आईनेच मित्राची बाजू घेतल्यामुळे या घटनेबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

राहत्या घरातूनच चालत होता ड्रग्जचा काळा बाजार; पुण्यात मार्केट यार्ड परिसरात पोलिसांनी छापा टाकत एकाला ठोकल्या बेड्या, दुसरा फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp