Friday, August 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 August 2026, 21:38

पुणे : मराठवाड्यात चार महिला मराठा लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यामुळे राज्यात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमधील या लोकप्रतिनिधींचे दाखले रद्द झाल्याने राजकीय वातावरण तापले असून या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी संबंधित सदस्यांनी सुरू केली आहे.

कागदपत्रांमधील त्रुटी आणि पुराव्यांचा अभाव ही प्रमाणपत्रे रद्द होण्यामागची मुख्य कारणे आहेत:

ज्योती शिंदे (छत्रपती संभाजीनगर): जिल्हा परिषदेच्या गोलटगाव गटातील ‘प्रहार’च्या सदस्या ज्योती शिंदे यांना वडिलांच्या बाजूने कुणबी नोंदीचे महसुली किंवा शालेय पुरावे सादर करता आले नाहीत.

वर्षा गायकवाड (गंगापूर): गंगापूर नगरपालिकेतील या सदस्याचे जात प्रमाणपत्रही समितीने रद्द केले आहे.

 

कोमल पारवे (परभणी): परभणी जिल्हा परिषदेच्या पूर्णा तालुक्यातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) सदस्या कोमल पारवे यांनी जोडलेली कागदपत्रे संशयास्पद आढळल्याने त्यांचा दावा अमान्य करण्यात आला.

रेखा सरोदे (माजलगाव): माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा सरोदे यांनी दुसऱ्या वंशावळीतील नामसदृश नोंदींचा आधार घेतल्याची तक्रार झाल्यानंतर पडताळणी समितीने कारवाई केली.

या निर्णयावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारने स्वतः शोधलेल्या कुणबी नोंदी आता जाणीवपूर्वक रद्द केल्या जात असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. 58 लाख कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्रे दिली जात नसल्याच्या विरोधात ते 29 ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.

दुसरीकडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 90 टक्के कुणबी प्रमाणपत्रे रद्द होतील असा दावा केला आहे, तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियमानुसार पारदर्शकपणे दाखले दिले जात असून नियमबाह्य प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे येत्या काळात कुणबी प्रमाणपत्रांचा वाद आणखी उग्र होण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी प्रकरणाची चौकशी; जिल्हा शल्य चिकित्सकांकडून समिती स्थापन करण्याचे आदेश

Thursday, 6 August 2026, 22:58

आंबळे परिसरातील बिबट्याची दहशत अखेर संपली; वन विभागाच्या पिंजऱ्यात चार वर्षीय नर बिबट्या जेरबंद…..

Thursday, 6 August 2026, 22:44

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 पदांवर भरती,पवित्र प्रणालीद्वारे भरतीचा मार्ग मोकळा

Thursday, 6 August 2026, 22:32

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! CEIR पोर्टलच्या मदतीने १० हरविलेले मोबाईल शोधून मालकांच्या हाती; सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल परत

Thursday, 6 August 2026, 21:31

अवैध गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर कोंढवा पोलिसांचा ‘मोक्का’चा बडगा; टोळीप्रमुखासह पाच जणांविरुद्ध कारवाई

Thursday, 6 August 2026, 21:19

मोठी बातमी! नवीन टॅक्स दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; कर, गुंतवणूक ते TDS… जाणून घ्या सर्व मोठे बदल

Thursday, 6 August 2026, 20:48
Next Post

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.