Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक! सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांपासून धोका? भोंदू अशोक खरातच्या चौकशीत समोर आलं भलतंच कनेक्शन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 11 April 2026, 10:24

Ashok Kharat case : बीड : राज्यात सध्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजत असून यात आता एक अत्यंत खळबळजनक वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे म्हणजेच एसआयटीकडे बीडमधील एका व्यक्तीने गंभीर तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचे म्हटले आहे. या एका तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने थेट एसआयटीकडे धाव घेऊन ही धक्कादायक तक्रार नोंदवली आहे. अशोक खरात प्रकरणाशी संबंधित विविध धागेदोरे पोलीस तपासत असतानाच ही नवीन तक्रार समोर आल्याने तपासाची व्याप्ती आणि गुंतागुंत अधिक वाढली आहे. तक्रारदाराने रुपाली चाकणकर यांच्यापासून सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो असा खळबळजनक दावा केला आहे.

आता या तक्रारीमध्ये नेमके तथ्य किती आहे की केवळ खोडसाळपणा म्हणून ही तक्रार करण्यात आली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. राजकीय आकसातून कोणाला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केला आहे का, या दिशेनेही आता एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे, अशोक खरात याने ज्या महिलांची किंवा लोकांची फसवणूक केली आहे, त्यांच्यासाठी एसआयटीने हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या हेल्पलाईनवर तक्रारींचा मोठा ओघ सुरू असून दररोज शेकडो लोक संपर्क साधत आहेत. यामध्ये केवळ आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषणाचे गुन्हे नसून अनेक कौटुंबिक वादाशी संबंधित तक्रारींचाही समावेश असल्याचे समजते. या सर्व तक्रारींची सत्यता पडताळून पाहणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.

 

इतरांचे भविष्य सांगणाऱ्या या भोंदू अशोक खरातला आता स्वतःचे भविष्य मात्र अंधारात दिसत आहे. पोलीस कोठडीत असताना त्याने इथून बाहेर पडणे कठीण असून आपले मरण इथेच असल्याचे म्हटल्याची माहिती समोर आली आहे. खरातवर आतापर्यंत एकूण 15 गुन्हे दाखल झाले असून सध्या तिसऱ्या गुन्ह्यात त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने फसवणुकीचे गुन्हे कबूल केल्याचेही सांगण्यात येत आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि आर्थिक लूट केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर असून पोलीस अधिक पुरावे गोळा करत आहेत. या तपासात अजूनही काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आंबेगाव खून प्रकरणातील आरोपीला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Saturday, 29 August 2026, 13:13

निकाल आता उलटणार! 2024 नंतर महाराष्ट्रात बदललं राजकीय चित्र; नव्या सर्व्हेत ‘या’ पक्षाने घेतली आघाडी

Saturday, 29 August 2026, 12:59

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचे महाराष्ट्रात रिलाँचिंग करू नका’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Saturday, 29 August 2026, 12:26

मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार पसार! मांजरी बुद्रुकमध्ये भरदिवसा चोरी

Saturday, 29 August 2026, 12:22

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ! टायर पंक्चर करून कुटुंबाला लुटलं, 18 लाखांचा ऐवज लंपास

Saturday, 29 August 2026, 12:18

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

Saturday, 29 August 2026, 11:45
Next Post
Pune Crmie News

Pune Crmie News : भाचीवर अत्याचार करणाऱ्या काकाला 25 वर्षे सक्तमजुरी! सख्ख्या मावशीची फितुरी; पण मोबाईल शूटिंग ठरलं मुख्य पुरावा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp