Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निकाल आता उलटणार! 2024 नंतर महाराष्ट्रात बदललं राजकीय चित्र; नव्या सर्व्हेत ‘या’ पक्षाने घेतली आघाडी

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 29 August 2026, 12:59

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता. भाजपसह महायुतीच्या जागांमध्ये घट झाली, तर महाविकास आघाडीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत राज्यात आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता पुन्हा लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्राचा निकाल वेगळा असू शकतो, असा अंदाज एका नव्या सर्व्हेमधून व्यक्त करण्यात आला आहे.

एका खाजगी वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या लोकसभा निवडणूक झाल्यास देशात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. एनडीएला 326 जागा मिळण्याचा अंदाज असून, इंडिया आघाडीला 185 जागा मिळू शकतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 जागा मिळाल्या होत्या, तर इंडिया आघाडीने 234 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे सध्याच्या अंदाजानुसार एनडीएची कामगिरी सुधारू शकते.

महाराष्ट्राचा विचार केल्यास सर्व्हेमधील आकडे विशेष लक्षवेधी आहेत. 2024 मध्ये राज्यातील मतदारांनी महायुतीला मोठा धक्का दिला होता. त्यावेळी भाजपला 9, शिवसेना (शिंदे गट) 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना 1 जागा मिळाली होती. म्हणजेच महायुतीच्या वाट्याला एकूण 17 जागा आल्या होत्या. भाजपच्या जागांमध्येही मोठी घट झाली होती. मागील निवडणुकीत भाजपने 23 जागांवरून 9 जागांपर्यंत मजल गाठली होती.

याउलट महाविकास आघाडीने राज्यात जोरदार कामगिरी केली. काँग्रेसला 13, शिवसेना (ठाकरे गट) 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 8 जागा मिळाल्या. या तिन्ही पक्षांची बेरीज 30 जागांवर पोहोचली. एका अपक्ष खासदाराच्या पाठिंब्यामुळे हा आकडा 31 पर्यंत गेला होता.

 

मात्र, आता परिस्थिती बदलल्याचा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. आज निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात महायुतीला 31 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडी 17 जागांवर थांबू शकते. म्हणजेच 2024 च्या निकालाच्या तुलनेत दोन्ही आघाड्यांचे चित्र जवळपास उलटे होण्याची शक्यता आहे.

मतांच्या टक्केवारीतही महायुतीला आघाडी मिळण्याचा अंदाज आहे. सर्व्हेनुसार महायुतीला सुमारे 49 टक्के मते मिळू शकतात, तर मविआला 43 टक्के मतांचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणे कोणाच्या बाजूने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सर्व्हेतील अंदाज हे प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल नसतात. निवडणुकीपूर्वी बदलणारे राजकीय समीकरण, उमेदवार, स्थानिक प्रश्न आणि मतदारांचा कल यांचा अंतिम निकालावर परिणाम होऊ शकतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

आंबेगाव खून प्रकरणातील आरोपीला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp