उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घराजवळ असलेल्या पोलवरील विद्युत वाहक तारा उघड्या असून त्या तारा भूमिगत करून पुढे होणारा अनर्थ टाळावा या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहरच्या वतीने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महामूनकर यांना दिले आहे.
यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, पुणे जिल्हा युवती आघाडी उपाध्यक्ष पूजा सणस, युवा मोर्चा हवेली तालुका उपाध्यक्ष खुशाल कुंजीर भाजपा उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित सतिश कांचन, झोपडपट्टी संघाचे हवेली तालुकाध्यक्ष आबासाहेब चव्हाण, हवेली तालुका माथाडी अध्यक्ष करण धुमाळ, उरुळी कांचन,युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश कांचन, सचिव गणेश घाडगे आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनानुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत प्रभाग ४ मध्ये उघड्या असलेल्या विद्युत वाहक तारा (केबल) भूमिगत कराव्या, लाईट तारांना सेफ गार्ड बसविणे, वाढीव बिल आलेले योग्य ते करणे, आवश्यक तिथे नवीन डीपी टाकणे, तसेच काही तारा या इमारतीला चिटकून असल्याने वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ शकते.
काही तारा इमारतीच्या खिडक्या जवळ आहे. शहरीकरण वेगाने होत असल्याने पुढील अनर्थ होण्याआधी महावितरणने तेथील तारा (केबल) भूमिगत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.