शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील डिंग्रजवाडीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बंद पडलेल्या कंपनीची भिंत पडून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना आज बुधवारी (ता.19) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत सात ते आठ दुचाकी व दोन मोठ्या वाहनांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
मनमीत रामोतार रविदास कुमार (वय 28 रा. शेखपुरा राज्य बिहार) व राजीव रामयश कुमार (वय 31 रा.जौनपुर, शहागंज, उत्तर प्रदेश) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर बंडू विधाते व सतीश कानगुडे (रा. सणसवाडी, तालुका शिरूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
दोन्ही जखमींना शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.
सविस्तर वृत्त थोड्या वेळातच