हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) Traffic Jam News : पूर्व हवेलीत सहा आसनी रिक्षा व रिक्षांची वर्दळ वाढल्याने ठिकठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. (Traffic Jam News) त्यातच सहा आसनी रिक्षा रस्त्यावरच उभ्या राहत आहेत. (Traffic Jam News) त्यामुळे तर अनेक वेळा रिक्षाचालकांकडून एसटी बस व पीएमपीएमएलची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याची तक्रार नागरिक करत असून अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Traffic Jam News)
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत ज्या प्रमाणात सहा आसनी रिक्षा तसेच रिक्षा वाढल्या आहेत. त्याच प्रमाणात त्यांचे अनधिकृत थांबे वाढले असल्याचे वास्तविक चित्र आहे. त्यामुळे जेथे रिक्षा थांबेल, तोच आपला थांबा अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी पहायला मिळत आहे. आरटीओ, वाहतूक पोलिसांनी याबाबत ठोस पावले उचलल्यास चौकाचौकांत अनधिकृत रिक्षा थांब्याची झालेली विदारक स्थिती आटोक्यात येऊ शकते, अन्यथा तो प्रश्न अधिकच जटील बनणार असल्याचे नागरिक बोलून दाखवित आहेत.
रविवारी उरुळी कांचन येथील आठवडे बाजार असल्याने तसेच सुट्टीचा वार असल्याने अनेक प्रवासी बाजारासाठी गावात येतात. तळवाडी चौकात दोन्ही सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूला खाजगी व्यवसायकांनी विविध दुकाने मांडल्याने रहदारीच्या समस्या निर्माण होत आहेत. काही विक्रेत्यांनी आठवडी बाजार असल्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली आहेत. तसेच त्यात कमी म्हणून काही रिक्षाचालक व काही खाजगी वाहने घेऊन जाणारे चालक यांनी थेट महामार्गावरच रिक्षा उभ्या करीत असल्याचे दिसून येत आहे. या चालकांना पोलिसांचा वचक राहिला नसल्याने चालक थेट महामार्गावरच रिक्षा लावून निवांत फिरत असल्याचे दिसून येत आहे.
लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात रिक्षांची संख्या वरचेवर जास्तच वाढत चालली आहे. बाहेरून येणाऱ्या रिक्षांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे रिक्षांचे थांबे किती आहेत, एका थांब्यावर किती रिक्षा, याची माहिती जाहीर नसल्याने त्यावर सर्वस्वी रिक्षा चालकांचाच अधिकार असल्याची त्यांची भावना आहे. वास्तविक रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी ठोस उपायांची गरज आहे. मात्र, पोलिस, आरटीओ त्यापासून अनभिज्ञ आहे. त्यामुळे या गावात रिक्षासोबतच त्याच्या थांब्याचेही प्रमाण वाढतच आहे. रिक्षाचालकांच्या मनात येईल ते ठिकाण ते थांबा म्हणून वापरतात. यावर ठोस निर्णय नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
वाहतूक शाखेचे पोलिस असून अडचण नसून खोळंबा…!
लोणी काळभोर येथील एमआयटी संस्थेत जाणाऱ्या चौकात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकातून शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांची देखील मोठी वर्दळ असते. मात्र बेशिस्त रिक्षाचालक रस्त्याच्या कडेला थांबून प्रवासी भरण्यात मग्न असतात. या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलिस असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था पाहायला मिळत आहे.
याबाबत बोलताना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल म्हणाले, ” ज्या ठिकाणी ट्राफिक जाम होत आहे अशा ठिकाणी रिक्षा अथवा सहा आसनी रिक्षाचालकांनी थांबू नये याबाबत चालकांना वारंवार सुचना देण्यात आल्या आहेत. यापुढे या परिसरात अशी खाजगी वाहने अथवा रिक्षा आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा बेशिस्त रिक्षा वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत.
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील अक्षय (बंटी) कांचन म्हणाले, “अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी व तीनचाकी वाहनांवर नियमानुसार व्यवसाय करण्यासाठी शहर पोलीस वाहतुक शाखेच्या पोलिसांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे,ते करुनही त्यांच्यातील बेशिस्तपणा कमी होत नसेल तर कडक कारवाई करावी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Traffice Update : शिंदवणे ते वाघापूर या मार्गावरील वाहतूक १ महिन्यासाठी बंद
Shiv Jayanti 2023 : पुण्यात शिवजयंती मिरवणुकीनिमित्त वाहतुकीत बदल ; जाणून घ्या