खडी: कोंढवा बुद्रुक येथील खडी मशीन चौकात वाहतूक कोंडी हा प्रश्न नित्याचाच आहे. मंगळवारी सकाळी पावणतास वाहतुक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) सिग्नल बसविल्यापासून ते सुरूच झालेले नाहीत. चौकातील सर्व बाजुंचे सिग्नल दिवे सुरु नसल्यामुळे त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. येथे सिग्नल बसवुन व्यवस्थित वाहतुक केव्हा सुरु केली जाणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
मंतरवाडी बाह्यवळण मार्ग व कोंढवा-येवलेवाडी मार्ग यांना जोडणारा कोंढवा बुद्रुक येथील खडी मशीन चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक झाला आहे. या ठिकाणी दररोज तासनतासस जीवघेणी वाहतूक कोंडी होऊल छोटे-मोठे अपघात घडत आहेत. ही वाहतूक
मात्र, वाहतूक पोलीस विभाग व पालिका प्रशासन यांच्या शिस्त आणि समन्वयाच्या अभावामुळे वाहनचालकांना ञास सहन करावा लागत आहे.
यामुळे अनेक बेशिस्त वाहनचालक वाहने आडवी-तिडवी चालवून वाहतूक ठप्प करीत आहेत. काही वेळेस वाहतूक पोलीस नसल्यास येथे तासंनतास भीषण वाहतूक कोंडी होते. हजारो अवजड वाहनांची कात्रज बाह्यवळण मार्गावरुन वर्दळ अहोरात्र सुरु असते, त्यामुळे शाळकरी मुले, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरीक यांना तर या चौकातून रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. त्यामुळे या चौकातील सिग्नल तातडीने सुरू करावेत, अशी मागणी करुन वाहतुककोंडी सोडवावी अशी मागणी दैनंदीन वाहनचालक व नागरीकांनी केली आहे.