Three Arrested For Betting On IPL : पुणे : आयपीएलमधील चिन्नई विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर सट्टा घेणार्यावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने छापा टाकून तिघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई कोंढव्यातील साईबाबानगर येथील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत शनिवारी सायंकाळी करण्यात आली. (Three arrested for betting on IPL; Big action in Kondhwa, involving big bookies including a pub owner)
वसीम हनीफ शेख (वय३९, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द), इक्रामा मकसुद मुल्ला(वय २६, रा. मदने सोसायटी, घोरपडी पेठ) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब (वय ३५, रा. सोमवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जितेश मेहता (रा. पुणे) व अक्षय तिवारी (रा. इंदोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Three Arrested For Betting On IPL)
याबाबत पोलीस नाईक शंकर संपते यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पब मालकासह बड्या बुकींचा समावेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथक कोंढव्यातील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत पोहचले. (Three Arrested For Betting On IPL) चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाईट आयडीद्वारे मोबाईल व लॅपटॉपचा वापर करुन सट्टा घेतला जात होता. पोलिसांनी तेथे असलेल्या तिघांना पकडले.
त्यांच्याकडून ५ मोबाईल, लॅपटॉप व एक डायरी असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यातील माहितीनुसार, त्यांनी यापूर्वीही आयपीएल २०२३ मधील सामन्यांवर सट्टा घेतलेले व खेळलेले दिसून आले आहे. (Three Arrested For Betting On IPL) त्यांच्याबरोबर जितेश मेहता आणि इंदौर येथील अक्षय तिवारी यांच्याशी संगनमत करुन हा सर्व प्रकार सुरु होता. जितेश मेहता हा पबमालक आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेल्या दोन बिहाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या