पुणे : पुण्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता लग्नास नकार देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत केशवनगर मुंढवा तसेच फडके हौद परिसरात घडला.
याप्रकरणी ४३ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अंकीत नंद तिवारी (वय-३८ रा. पॅनासिया हाईट्स, फडके हौद, पुणे, मुळ रा. टेहरी ताचेन्नारी सासारा, बिहार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. महिलेने अंकीत याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली.
महिलेने अंकित तिवारीकडे लग्नाबाबत तगादा लावला असता त्याने लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. तसेच तु जर माझी तक्रार केली तर तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.