सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर: कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे अंजना महादेव कामठे यांचा मुलगा विमानतळ ड्रोन मोजणीच्या ठिकाणी गेला असता, तो लवकर परत आला नाही म्हणून, धसका घेऊन, अंजना महादेव कामठे यांचे निधन झाले आहे. याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन व सरकार असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद, सचिन अहिर आमदार, नेत्या सुषमा अंधारे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, अभिजीत जगताप तालुकाप्रमुख पुरंदर आदी सांत्वन करण्यासाठी कुंभारवळण येथे आले होते. दानवे पुढे बोलताना म्हणाले की, काळ्या मातीवर प्रेम करणारा शेतकरी म्हणजे मी स्वतः आहे, यासाठी जातीचा हाडा मासाचा व्यक्ती असायला लागतो, तो म्हणजे शेतकरी आहे. 2016 पासून विमानतळाचे प्रश्न चालू आहे. सात गावातील जमिनीचा एक इंच सुद्धा विमानतळासाठी द्यायची नाही, आपली ही जमीन, काळी माता आईच आहे. तो प्रश्न या सरकारला काय कळणार? यासंदर्भात अंजना महादेव कामठे यांचे निधन झाले याला सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासन व सरकार आहे.
आंदोलकावर गुन्हा दाखल केला आहे, हे चुकीचे काम केले आहे. भूसंपादन केले का? तुम्ही आमच्या शेतात येता नोटीस दिली का? तर भूसंपादन करण्यासाठी रात्रीच्या वेळी ड्रोन चा वापर का? विमानतळासाठी एक वीट सुद्धा लागू देणार नाही. असेही अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले.
सचिन कामठे, अंकुश होले यांच्यावर अमानुष पद्धतीने लाठी हल्ला पोलीसांनी केला आहे. कायदा कानून पोलीस प्रशासनाने आम्हाला शिकवायचा नाही, आमचा लढा पोलिसांशी नाहीतर, सरकारशी आहे. जेवढे झाले तेवढे बास, गुन्हा दाखल केलेल्या सहा जणांना सोडून द्यावे, असेही अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले.
कायदेशीर पद्धतीने पोलीस प्रशासनाने काम करावे, 2673 हेक्टर जमीन विमानतळासाठी वापरताना, दहा हेक्टर क्षेत्र नापिक आहे, बाकी 2235 हेक्टर जमीन या बागायती आहेत. तर काही ठिकाणी जिराईत आहे. तर यामध्ये बागायत क्षेत्र हे जास्त असल्यामुळे भूसंपादन होऊ शकत नाही. विमानतळ करायचे तर बारामतीला करा, बारामतीचे विस्तारीकरण करा, शेतकरी हा दलाल नसून, विद्यमान आमदार हे पुरंदरचे दलाल आहेत,असेही अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले.
अप्रत्यक्षरीत्या आमदारावर सुद्धा टीका टिप्पणी करण्यात आली. तर यावर मंत्री आमदार पुरंदरचे विमानतळाच्या संदर्भात या सात गावासाठी समोर येत का? नाही तर तोच त्यांचा नाकर्तेपणा आहे, त्यामुळे हे विमानतळ या सात गावात होऊ शकणार नाही, असे ठणकावून दानवे यांनी सांगितले.
सचिन अहिर, सुषमा अंधारे, बब्बूबाई कुंभारकर, महादेव टिळेकर, प्रमोद सु. कामठे, संतोष हगवणे, के.डी. मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंजुषा गायकवाड कुंभारवळण सरपंच, राजश्री कुंभारकर वनपुरी, सविता मगर उदाचीवाडी, ज्योती मेमाणे पारगाव, स्वप्नाली होले खानवडी, शितल टिळेकर एखतपुर, सुजित कुंभारकर, चेतन मेमाणे, दत्ता झुरुंगे, प्रमोद कामठे, सात गावातील शेतकरी, महिला, युवक, जेष्ठ नागरिक बहुसंख्येने आदी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविक पी .एस. मेमाणे यांनी केले. तर आभार देविदास कामठे यांनी मानले आहे.