पिंपरी-चिंचवड : महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देत पाच लाख रुपये उकळणाऱ्या देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दोन पोलिसांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ नुसार शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे आणि सध्या निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी हेमंत गायकवाड आणि सचिन शेजळ अशी त्या पोलिसांची नावे असून, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत.
दरम्यान, ४५ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स विक्रीच्या प्रयत्नांत थेट सहभाग असलेल्या आणि सध्या अटकेत असलेला फौजदार विकास शेळके याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी हे आदेश दिले आहेत.