लोणी काळभोर : Loni Kalbhor Crime News : लोणी काळभोर (ता. हवेली) (loni-kalbhor) येथे गतिमंद महिलेचा (dynamic-woman) गैरफायदा घेऊन बलात्कार (raped) करणाऱ्या नराधमाला १५ वर्ष सक्त मजुरी (15-years-of-hard-labour)व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा (sentenced) पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठाविली आहे. हे आदेश अतिरिक्त जिल्हा न्यायधिश एस. बी. साळुंखे यांनी दिले आहेत. तर या गुन्ह्यातून तीन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. (Loni Kalbhor Crime News) the-murderer-who-raped-a-dynamic-woman-in-loni-kalbhor-was-sentenced-to-15-years-of-hard-labour
एका नराधमाला १५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तर तीन जणांची निर्दोष मुक्तता
बाळासाहेब गोविंद देवडे (वय-७५, सध्या रा. लोणी काळभोर, दत्तमंदीराजवळ, ता. हवेली. मूळ रा. खामगाव, पोस्ट साखरवाडी, ता फलठण. जी सातारा) अशी शिक्षा ठोठविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तर गणेश बाळासाहेब देवडे (वय ३२) झुंजार बाळासाहेब देवडे, (वय ३०, दोघेही रा. लोणीकाळभोर, दत्तमंदीराजवळ, ता. हवेली.)आणि गणपत बबन फणसे (वय- ५६, रा. जातेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सदर प्रकार हा मार्च २०१५ साली उघडकीस आला होता.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गतिमंद पणाचा गैरफायदा घेवून आरोपी बाळासाहेब देवडे याने अनैतीक संबंध ठेवून वारंवार बलात्कार केला आहे. पिडीत नात्यातील आरोपी गणपत फणसे यांच्या घरी गेली असता, आरोपी फणसे हा सुध्दा पिडीत गतिमंद महिलेचा गैरफायदा घेऊन लैगीक अत्याचार केला आहे. तर आरोपी झुंजार देवडे व गणेश देवडे यांनी पिडीतेच्या शरीराचे अवयावाशी वाईट भावनेने स्पर्श केले आहेत. अशी फिर्याद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी वरील चारही आरोपींना अटक केली होती.
सदर खटला हा पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा न्यायधिश एस. बी. साळुंखे यांच्या खंडपीठात सुरु होता. पीडित मुलगी ही गतिमंद होती, तिचे साक्षीचे संभाषण करून देण्यासाठी ससूनच्या खास डॉक्टरांना बोलाविण्यात आले होते. पिडीता इशाऱ्यावरून काय बोलत आहे. हे डॉक्टरांनी स्पष्टीकरण करून न्यायाधीशांना सांगितले. सदर घटनेला ७ वर्ष झाले होते तरी पीडितेने उत्तम साक्ष दिली. आणि तिची साक्ष व इतर पुरावे या खटल्यांमध्ये आरोपीला शिक्षा देण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत.
दरम्यान, या प्रकारातून गतिमंद महिला हि गर्भवती राहिली होती. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. ती चुमुकलीला पुण्यातील एका अनाथ आश्रमात ठेवले आहे. आरोपी बाळासाहेब देवडे याचा डीएनए त्या मुलीशी जुळला आहे. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायधिश एस. बी. साळुंखे यांनी आरोपी बाळासाहेब देवडे याला भारतीय दंड विधायक कलम ३७६(२) (एफ)(जे)(एल) अन्वेय दोषी धरून १५ वर्षे सक्त मजुरी व रुपये ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरित तीन आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वकील बोंबटकर व पठारे यांनी कामकाज पाहिले. तर त्यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान, महिला पोलिस हवालदार ललिता कानवडे, व पोलीस नाईक संतोष सोनावणे आणि पोलिस शिपाई संदीप धुमाळ यांनी मदत केली आहे.