Wagholi News वाघोली, (पुणे) : वाघोली 23 गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र येथील शासकीय, गायरान जमिनींची मालकी जिल्हाधिकार्यांच्या नावावर आहे. त्यामुळे या जमिनींवर होणारे अतिक्रमण काढणे, तसेच त्याचे संरक्षण करताना महापालिकेला अडचणी येत होत्या. या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत असल्याच्या तक्रारी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता वाघोतील शासकीय जमिनीची देखभाल महापालिका करणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.
’महापालिकेकडे देखभाल व अतिक्रमण संरक्षणार्थ’ अशी नोंद
भागातील शासकीय गायरान, खाणपड अशा एकूण सुमारे 120 एकर (47 हेक्टर 73 आर) जमिनींच्या सातबारावर ’महापालिकेकडे देखभाल व अतिक्रमण संरक्षणार्थ’ अशी नोंद जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. यामुळे या जमिनींवरील अतिक्रमणे काढणे व संरक्षण करणे, तसेच सार्वजनिक सोयीसुविधासाठी आरक्षणे प्रस्तावित करणे महापालिकेला सोपे झाले आहे.
या जमिनीची देखभाल महापालिकेकडे दिल्यास अतिक्रमणांना पायबंद आणता येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लक्षात आले. यामुळे जिल्हाधिकार्यांनी याबाबतचे आदेश काढल्याने वाघोलीतील या जमिनींच्या सातबारावर महापालिकेकडे देखभाल व अतिक्रमण संरक्षणार्थ नोंद करण्यात आली आहे. या जमिनींचे संरक्षण करणे, सार्वजनिक प्रयोजनासाठी वापर करणे व अतिक्रमणे काढण्यासाठी नियोजन प्राधिकारी म्हणून महापालिकेला आता काम पाहता येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा..
Wagholi Fire : वाघोलीतील शुभ गोडावूनला भीषण आग ; अशुभ घटनेत तिघांचा होरपळून जागीच मृत्यू