अजित जगताप
कातर खटाव : नऊशे लोकसंख्या असलेल्या खटाव तालुक्यातील पळसगावांमध्ये गेले अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्यामध्ये वाढीव क्षार येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पळसगावचे सामाजिक कार्यकर्ते मनोज धनंजय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी शिष्टमंडळाने खटाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख यांची भेट घेतली. सदर माहिती घेऊन त्यांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे आदेश दिले.
पळसगाव या ठिकाणी पाण्याचे मुख्य सोत्र हातपंपापासून असून या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा कार्यरत नाही. सदरचे पंपापासून चारशे मीटर अंतरावर सार्वजनिक पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडले जाते आणि त्याच पाण्याचे वितरण गावात होते. अलीकडच्या काळामध्ये पाण्यात मिसळून क्षार चे पाणी घरोघरी जात आहे. पाण्याची भांडी पांढरी होऊ लागली आहेत. अनेकांना मुतखड्याचा त्रास होऊ लागला आहे.
यामुळे सामाजिक कार्यकर्ते मनोज घाडगे, सुगधं घाडगे, चैतन्य गोडसे, विक्रम घाडगे, प्रदीप घाडगे, आकाश गोडसे यांनी तातडीने खटाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख यांची भेट घेतली. आज योगायोगाने आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालय उपस्थित असल्यामुळे त्यांनी त्वरित तातडीने सर्व पाण्याच्या सोत्राचे रसायन व क्षार पाण्याचे नमुने तपासणी करण्याचे आदेश दिले.
पळसगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत विहीर असून सदर विहिरीचे पाणी दूषित असल्यामुळे त्याचा वापर कोणी करत नाही. त्याच्याही पाण्याचे नमुने तपासणी करून पाण्याचे सूत्र वाढवावे . असे सांगण्यात आले. सदर पाण्याबाबत गांभीर्याने प्रश्न सोडवण्याची हमी आरोग्य अधिकारी डॉ. शेख यांनी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.
दरम्यान, सदर पाण्याच्या प्रश्नाबाबत आंदोलन करण्याची भूमिका घेतलेल्या कार्यकर्त्यांनी प्रश्न जर सामोपचाराने सुटत असेल तर आंदोलन करण्याची गरज नाही. असे स्पष्ट करून आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न विचारला जात होता. पण, मुदत संपून ही निवडणुका होत नसल्याने स्थानिकांना गाऱ्हाणी मांडवी लागत आहेत. याचा विचार राज्य सरकारने करावा असे मत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.