लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा दत्तात्रय गाढवे यांची 10 विरुद्ध 6 मतांनी निवड झाली आहे. कुंजीरवाडीचे उपसरपंच दीपक ताम्हाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच हरिष गोठे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 03) हि निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत सुरेखा दत्तात्रय गाढवे व सागर यशवंत निगडे यांचा उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आला होता. उपस्थित सदस्यांमध्ये गुप्त मतदान घेण्यात आले. यावेळी निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी सविता भुजबळ यांनी पाहिले. या गुप्त मतदान प्रक्रियेत सुरेखा गाढवे यांना 10 तर सागर निगडे यांना 6 मते मिळाली. यावेळी उपसरपंचपदी सुरेखा गाढवे यांची निवड झाल्याची घोषणा सरपंच हरिष गोठे यांनी केली.
यावेळी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, संतोष कुंजीर, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, बाप्पुसाहेब घुले, शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर, सदस्य संग्राम कोतवाल, अमर कुंजीर, विश्वनाथ गाढवे, भाऊसाहेब गणपत कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, चंद्रकांत मेमाणे, गोकुळ ताम्हाणे, गोरख तुपे, काका गाढवे, शुभम तुपे, भाऊ धुमाळ, विश्वनाथ गाढवे, किरण गाढवे, सर्व सदस्य व नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत उपसरपंच सुरेखा गाढवे म्हणाल्या, “गावच्या सर्वांगिण विकास कामासाठी प्रयत्न करु. तसेच भविष्यकाळात मी विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे.”