लोणी काळभोर : समाजाचे आपण काहीतरी देणे असते, या निपक्ष भावनेतून सनी काळभोर हा नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहे. गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहचविण्याचे चांगले काम करून जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करीत आहे. लोणी काळभोर परिसरातील त्याने राबविलेल्या योजनांचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला आहे. त्याचे कार्य कौतुकास्पद असून तरुण पिढीने आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले आहे.
भारतीय डाक पुणे शहर (पुर्व विभाग) व आमदार अशोक पवार यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील शिवशक्ती भवन येथे भव्य आधारकार्ड शिबिराचे आयोजन बुधवारी (ता. 4) करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष आप्पा काळभोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले, समाजात जीवन जगत असताना, नागरिकांनी आपण केलेल्या कामांना बघून ओळखले पाहिजे. तुम्ही चांगली कामे करीत जावा. जनता नेहमी तुमच्या पाठीशी खंभीर उभी असेल. पंचकृषित विविध समाजोपयोगी कामे करून सनीने एक चांगला ठसा उमटविलेला आहे. असे म्हणून आमदार अशोक पवार यांनी सनी काळभोरचे भरभरून कौतुक केले.
दरम्यान, आधारकार्ड संबंधित समस्या सोडविण्यासाठी बुधवारी (ता. 4) एकाच दिवसी तब्बल 800 नागरिकांनी लाभ घेतला आहे. हे शिबीर अजून दोन दिवस म्हणजे शुक्रवार (ता. ६) पर्यंत चालणार आहे. या शिबिरात नवीन आधारकार्ड काढणे, चुक दुरुस्ती करणे, आधारला मोबाईल नंबर लिंक करणे, आधारकार्ड अपडेट करणे, नावात बदल करणे व आधारकार्ड पत्ता बदलणे या सुविधा देण्यात येत आहेत. आणि या शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आहे.
यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, सागर काळभोर, अमित काळभोर, माऊली काळभोर, चंद्रकांत नामदेव काळभोर, सूर्यकांत काळभोर, राहुल वलटे, भगवान काळभोर, राजकुमार काळभोर, विनायक शिंदे, ऋतिक काळभोर, अजय पाठारे, श्रीकांत शेलार, जगन्नाथ वीरकर, सचिन कोळपे, ऋषिकेश करंजखेले, दीपक काळभोर, सुनील गायकवाड, राहुल बोरकर, मनोज गायकवाड, शिवाजी रामचंद्र काळभोर, विठ्ठल म्हस्के, भानुदास कोळपे, गोपाळ गुलाब काळभोर, ऋतिक पुरुषोत्तम काळभोर, विजय बाळासाहेब काळभोर, चंदू काळभोर, शुभम धावणे, संग्राम काळभोर, निलेश काळभोर, विशाल काळभोर, गणेश काळभोर, नवनाथ काळभोर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करीत आहे. शासनाच्या सर्व योजना व सुविधांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजे. यापासून कोणीही वंचित राहू नये. म्हणून नेहमी तळमळ असते. आधारकार्ड दुरुस्ती अथवा नवीन काढण्यासाठी नागरिकांना खूप अडचणी येत आहे. त्याच अनुषंगाने आता जनतेसाठी आधारकार्ड शिबिराचे आयोजन तीन दिवस केले आहे. या शिबिराचा सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. व आधारकार्डच्या संदर्भातील अडचणी सोडवाव्यात.
सनी उर्फ युगंधर काळभोर (माजी उपसभापती -हवेली पंचायत समिती)