लोणी काळभोर, (पुणे) : रेनबो इंटरनॅशनल स्कूल लोणी काळभोरच्या विद्यार्थींनीनी आक्रमक व वेगवान चढाया करीत जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती शाळेचे अध्यक्ष नितीन काळभोर यांनी दिली.
जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने 14 वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन इंदापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत रेनबो इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
14 वर्षे वयोगट मुलींच्या हॅण्डबॉल स्पर्धेत रेनबो इंटरनॅशनल स्कूलची हॅण्डबॉल स्पर्धा खेळण्याची ही पहिलीच वेळ असताना देखील मुलींच्या संघाने उत्तम कामगिरी केली. या मुलींच्या संघातून कर्णधार वैष्णवी बोऱ्हाडे, प्रांजल काळभोर, दुर्वा बोळे, रिया दुगाने, अनुष्का काळभोर, अनुष्का कामठे, प्राची शिंदे, रेवा पाटील, भार्गवी सुर्वे या खेळाडूंनी उत्तम लढत दिली.
तालुकास्तरीय 14 वर्षीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा बालेवाडी येथे संपन्न झाल्या. यामध्ये 14 वर्ष मुलांच्या वयोगटात थाळीफेक स्पर्धेत विश्वजित कांदे याने प्रथम तर आदित्य लोखंडे याने तृतीय क्रमांक पटकाविला. मुलींमध्ये सृष्टी गायकवाड द्वितीय व स्वरा काळभोरने तृतीय क्रमांक मिळविला. 400 मीटर धावणे स्पर्धेत शिवम चव्हाणने चौथा क्रमांक पटकाविला.
बुद्धिबळ स्पर्धेत गुरुराज वलांडे, अनुष्का काळभोर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर रेवा पाटील व सई काळभोर यांनी बुद्धिबळ स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. यांच्याबरोबरच 17 वर्षे वयोगट मुली बुद्धिबळ स्पर्धेत समृद्धी वलांडेचा प्रथम क्रमांक आला. या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालीआहे. या सर्व स्पर्धासाठी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक निखिल जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
दरम्यान, रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष नितीन काळभोर, प्राचार्या मिनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. जिल्हास्तरीय स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पंचक्रोशीतून पालक, ग्रामस्थ यांच्याकडून शाळेचे व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.