दीपक खिलारे
इंदापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पत्रकार दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथे शनिवारी (ता. ६) मालोजीराजे भोसले राज्यस्तरीय महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी दिली.
स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे : आता पुस्तके शोभेसारखी वाटतात अधूनमधून, कितीही मारले तरीही गांधी मरत नाहीत, भारत २०२४ नरेंद्र मोदींचा की राहुल गांधींचा?, कोविडनंतरचा माणूस, शाळेचे जग विरुद्ध जगाची शाळा, संतांचे पुकार वांज झाले, हवामान बदल मानवी अस्तित्वासमोरील संकट हे असणार आहेत.
या वेळी प्रथम विजेत्यांना पारितोषिक अकरा हजार व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक सात हजार व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक पाच हजार व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन हजार रुपयांची पाच पारितोषिके व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. ४ जानेवारी पूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७०२८१९००१९, ९६६५४००३०१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे