लोणी काळभोर, ता. 30 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक सोमनाथ सदाशिव दळवी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्य ज्ञान संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मागील 20 वर्षापासून ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असणारे सोमनाथ दळवी यांची शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे .
दरम्यान, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यात सोमनाथ दळवी यांना संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्राध्यापक मनोज साबळे यांचे व्याख्यान झाले.