बारामती: सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या बँक खात्यावर प्रतिटन ३२० रुपयांप्रमाणे दिवाळीसाठी अंतिम बिल वर्ग केले आहे. याशिवाय, परतीची ठेव, ऐच्छिक ठेव याही रकमा व्याजासह जमा केल्या असून, एकूण ६३ कोटींची बिले जमा केली आहेत, अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
दिवाळीपूर्वी बिले अदा झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सोमेश्वर कारखान्याने २०२३/२४ हंगामाचा अंतिम भाव ३५७१ रुपये प्रति टन इतका जाहीर केला होता. हंगामाच्या सुरुवातीला प्रति टन तीन हजार रुपये एक रकमी पहिला हप्ता तर हंगाम समाप्त प्रति टन शंभर रुपयांचा हप्ता दिला होता.