पुणे : भाजपचे युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख सुनील धुमाळ यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. रेल्वेखाली येत त्यांनी जीवन संपवले आहे. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरानळी रेल्वे ट्रॅकवर धुमाळ यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सुनील धुमाळ यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरा नळीमध्ये सुनील धुमाळ वास्तव्याला होते. या आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, धुमाळ यांच्या आत्महत्येमागील गूढ अद्याप कायम आहे.