( Shivsena News ) पुणे : शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट कमेंट व मॉर्फ व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसिध्द झाल्याने राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे राजकणात आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (Shivsena News) नेते संजय राऊंत यांनी देखील या व्हिडिओची सत्यता पडताळावी असे म्हटले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणार्ऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी वक्तव्य केल्याने वाद होण्याची शक्यता आहे. यावर शीतल म्हात्रे या काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.
शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी पोलिसांना दिले निवेदन…
दरम्यान, शिवसेना पक्षाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी शिवसेना उपनेत्या शितलताई म्हात्रे यांची बदनामी करणाऱ्यांवर शिक्षा करावी, अशी मागणी करणारे निवेदन स्वारगेट पोलीसांना दिले आहे.
असा कट करणाऱ्या आणि आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्याचे फेसबुक अकाउंटवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यासंबंधीचे दोषी आढळलेल्यांवर न्यायालयीन प्रक्रिया राबवून योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे , पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्चपासून संपावर
विधवा; या शब्दात बदल करण्यासाठी शिफारस करणार ; रूपाली चाकणकर