पुणे : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शिवसेना(शिंदे गट) पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे व शिवसैनिक हे सोमवारी 29 जुलै रोजी सकाळी 3.45 वाजता हडपसर आगार, शेवाळवाडी आगार आणि भेकराई आगार येथे आंदोलन करणार आहेत. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे निषेध आंदोलन असणार आहे. याबाबतचे निवेदन भानगिरे यांनी हडपसर पोलीस स्टेशनला दिले आहे.