Shirur News : शिरूर: शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील चार शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवारी (दि.९) पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला सन्मान
शिरूर तालुक्यातच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारे पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये भाऊसाहेब पोपट उचाळे (जि. प. शाळा वसेवाडी), (Shirur News ) रोहिदास अर्जुन सोदक (जि. प. शाळा ढोक सांगवी), सुशिला अशोक बोखारे (जि. प. शाळा पिंपळे खालसा), प्राजक्ता अनिल व्यवहारे (जि. प. शाळा शिक्रापूर) यांना पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, जिल्हा परिषद माजी सदस्या सुनिता गावडे, (Shirur News ) पंचायत समिती माजी सदस्या अरुणा घोडे, माजी सरपंच दामूशेठ घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, उपाध्यक्ष साहेबराव लोखंडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : आंदोलक मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी शिरूरला महिलांचे लक्षणिक उपोषण
Shirur News : पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वतीने शाहिर विलास अटक यांचा सन्मान