अक्षय भोरडे
Shirur News : तळेगाव ढमढेरे : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्मवीर संभाजीराजे मार्केट यार्ड उपबाजार येथे नुकतेच भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांनी भेट घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या व शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देणाऱ्या बाजार समितीच्या समस्या सोडवणार असल्याचे जयेश शिंदे यांनी सांगितले.
यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे, सुरज शेलार, आडते असोसिएशनचे अध्यक्ष बापूसो गावडे, उपाध्यक्ष धनंजय भुजबळ, ज्येष्ठ व्यापारी नरसिंग ढोकले, योगेश गायकवाड, संकेत गोडसे, (Shirur News) प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शेळके, निलेश ननवरे, सतीश बांगर, अतुल तांबे, बापूसाहेब ढोकले, शरद उमाप, चांगदेव नरवडे यांसह शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन जयेश शिंदे यांनी दिले.
जयेश शिंदे यांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना उपवासानिमित्त चिक्की वाटप करण्यात आली. यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जयेश शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.(Shirur News) तर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे यांनी सर्वांचे आभार मानले.
दोन महिन्यांत मार्केटयार्ड सिमेंट काँक्रिटीकरण करून देणार
पावसाने किरकोळ हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला चिखलात ठेवावा लागत असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्यांनी आपण प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून पुढील दोन महिन्यांमध्ये संपूर्ण मार्केट यार्ड सिमेंट काँक्रिटीकरण करून देणार असल्याचे जयेश शिंदे यांनी आश्वासन दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पिंपरखेड येथे तीन एकर ऊस विजेच्या ठिणगीने भस्मसात; शेतकऱ्याच्या लाखो रुपयांची राख