युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : जागतिक पर्यावरण दिन आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 87 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचे काम सर्व ग्रामपंचायतींनी हाती घेतले आहे. शिरूर विकास गटामध्ये पंचायत समिती, लागवड अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, कृषी विभाग अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्य पार पडले.
वृक्ष लागवडीचा उपक्रम ग्रामपंचायतीतर्फे आयोजित
शिरूर तालुक्यामध्ये शेकडो कंपन्या वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. या कंपन्यांमध्ये हवा, पाणी, माती, आवाज यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. यामुळे शिरूर तालुक्यातील पशुपक्षी, वृक्षासह इतर जीवजंतू या सर्वांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. औद्योगिकीकरणानंतर (Shirur News) मोठ्या प्रमाणावर तंबाखूयुक्त पदार्थांच्या उत्पादनामुळे घातक कचरा उत्सर्जनामुळे कर्करोगाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकूणच पर्यावरणाचे शोषण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे सभोवतालच्या परिसरात तापमानवाढीची समस्या समोर आली आहे. यातून उतराई होण्यासाठी हा वृक्ष लागवडीचा उपक्रम रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायतीतर्फे आयोजित करण्यात आला होता.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावामध्ये ग्रामपंचायत साठवणूक गृहासमोरील मोकळ्या जागेत तसेच रांजणगाव गणपतीमधील मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला, गावठाण, शेळकेवस्ती, खेडकर वस्ती, फंडवस्ती जिल्हा परिषद शाळा व (Shirur News) महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल अशा एकूण सहा शाळांमध्ये विद्यार्थी व मुख्याध्यापकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर जंगली व फळांच्या वृक्षांची लागवड कार्यक्रम संपूर्ण महिनाभर करणार आहोत. यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशन (RIA) यांच्या विद्यमान अध्यक्षांकडे ट्रीगार्ड, ठिबक, सोलर मोटर यांच्या मदतीची पत्राद्वारे आव्हान केले आहे.
या कार्यक्रमाची सुरवात महागणपती रांजणगाव गणपती येथून करण्यात आली. ग्रामपंचायत रांजणगाव गणपती व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व अण्णा हजारे यांचे अनुयायी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात उपस्थित होते.
यामध्ये प्रथम लोकनियुक्त सरपंच सर्जेराव बबनराव खेडकर, उपसरपंच संपत खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खेडकर, (Shirur News) आकाश बत्ते, विलासराव अडसूळ, सुजाता लांडे, सुप्रिया लांडे, स्वाती शेळके, अनिता बांदल, महागणपती इंग्लिश मीडियम शाळेचे संस्थापक डॉ. विकास शेळके, सामाजिक कार्यकर्त्या संगिता भुजबळ, सोनबा खेडकर, ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले