Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 87 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रांजणगाव गणपती येथे वृक्षारोपण

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Thursday, 15 June 2023, 18:03

युनूस तांबोळी

Shirur News : शिरूर :  जागतिक पर्यावरण दिन आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 87 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचे काम सर्व ग्रामपंचायतींनी हाती घेतले आहे. शिरूर विकास गटामध्ये पंचायत समिती, लागवड अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, कृषी विभाग अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्य पार पडले.

वृक्ष लागवडीचा उपक्रम ग्रामपंचायतीतर्फे आयोजित

शिरूर तालुक्यामध्ये शेकडो कंपन्या वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. या कंपन्यांमध्ये हवा, पाणी, माती, आवाज यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. यामुळे शिरूर तालुक्यातील पशुपक्षी, वृक्षासह इतर जीवजंतू या सर्वांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. औद्योगिकीकरणानंतर (Shirur News)  मोठ्या प्रमाणावर तंबाखूयुक्त पदार्थांच्या उत्पादनामुळे घातक कचरा उत्सर्जनामुळे कर्करोगाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकूणच पर्यावरणाचे शोषण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे सभोवतालच्या परिसरात तापमानवाढीची समस्या समोर आली आहे. यातून उतराई होण्यासाठी हा वृक्ष लागवडीचा उपक्रम रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायतीतर्फे आयोजित करण्यात आला होता.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी गावामध्ये ग्रामपंचायत साठवणूक गृहासमोरील मोकळ्या जागेत तसेच रांजणगाव गणपतीमधील मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला, गावठाण, शेळकेवस्ती, खेडकर वस्ती, फंडवस्ती जिल्हा परिषद शाळा व (Shirur News) महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल अशा एकूण सहा शाळांमध्ये विद्यार्थी व मुख्याध्यापकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

मोठ्या प्रमाणावर जंगली व फळांच्या वृक्षांची लागवड कार्यक्रम संपूर्ण महिनाभर करणार आहोत. यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशन (RIA) यांच्या विद्यमान अध्यक्षांकडे ट्रीगार्ड, ठिबक, सोलर मोटर यांच्या मदतीची पत्राद्वारे आव्हान केले आहे.

या कार्यक्रमाची सुरवात महागणपती रांजणगाव गणपती येथून करण्यात आली. ग्रामपंचायत रांजणगाव गणपती व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व अण्णा हजारे यांचे अनुयायी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात उपस्थित होते.

यामध्ये प्रथम लोकनियुक्त सरपंच सर्जेराव बबनराव खेडकर, उपसरपंच संपत खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खेडकर, (Shirur News) आकाश बत्ते, विलासराव अडसूळ, सुजाता लांडे, सुप्रिया लांडे, स्वाती शेळके, अनिता बांदल, महागणपती इंग्लिश मीडियम शाळेचे संस्थापक डॉ. विकास शेळके, सामाजिक कार्यकर्त्या संगिता भुजबळ, सोनबा खेडकर, ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले

Shirur News : ‘विचार तुमचे लिखाण आमचे’ पेरणी पुर्वी बीजप्रक्रिया महत्वाची – ए. बी. जोरी

Shirur News : वर्षाऋतुचा चिंब भिजवून काढणारा सोहळा व्हावा… पावसाची प्रतिक्षा, शेतकरी चिंताग्रस्त

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

Nagar News : बँकेतील अधिकारी, कर्मचारी असल्याचे भासवून व्यापा-यांना फसवणाऱ्या ५ आरोपींच्या आवळल्या मुसक्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp