Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मध्यरात्री सिनेस्टाइल कारवाई! भरधाव कारचा लोणी काळभोर ते शिरूरपर्यंत पाठलाग अन् झडती घेताच असं काही सापडलं की पोलिसही चक्रावले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 November 2026, 14:14

पुणे : ओडिशातून विक्रीसाठी पुण्यात आणला जात असलेला तब्बल २५० किलो गांजा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केला आहे. अमली पदार्थविरोधी पथक दोनने शिरूरमध्ये पाठलाग करून दोघांना अटक केली. या कारवाईत गांजा, वाहन आणि मोबाईलसह एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरात गांजाचा साठा वितरित होण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली.

अमली पदार्थविरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक जीवन माने बुधवारी पथकासह लोणी काळभोर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी कुंजीर लॉन्स परिसरातून पांढऱ्या रंगाची महिंद्रा एक्सयूव्ही भरधाव वेगाने येताना पोलिसांना दिसली. संशय आल्याने पोलिसांनी हाताने इशारा करून कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत सोलापूरच्या दिशेने वेगाने पळ काढला.

कारचालकाच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने वाहनाचा पाठलाग सुरू केला. संशयित कार शिरूर शहरात पोहोचल्यानंतर पोलिसांनी स्टेट बँक कॉलनी परिसरातील एका मोकळ्या जागेत तिला अडवले. त्यानंतर कारची झडती घेतली असता त्यामध्ये २५० किलो गांजा आढळून आला.

या प्रकरणी समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४, रा. सांगोल, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) आणि अजय जगदीश मोहिते (वय ३०, रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत १ कोटी २५ लाख रुपये असून, वाहन आणि मोबाईलसह एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुणे शहरात गांजाचा साठा पोहोचण्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री सिनेस्टाइल कारवाई! भरधाव कारचा लोणी काळभोर ते शिरूरपर्यंत पाठलाग अन् झडती घेताच असं काही सापडलं की पोलिसही चक्रावले

Friday, 27 November 2026, 14:14

शेतकऱ्यांसाठी बातमी! शेततळे बांधण्यासाठी मिळणार 75 हजारांपर्यंत अनुदान; पुणे जिल्ह्यातील लाभार्थी जाहीर

Friday, 27 November 2026, 13:46

नोकरदारांना मिळणार 42 हजार किमान वेतन? ग्रॅच्युइटीही दुप्पट होण्याची शक्यता; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 27 November 2026, 13:17
Accident

इंदापूर-टेंभुर्णी मार्गावर अपघात; भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Friday, 27 November 2026, 12:59

सोलापूर जिल्हा बँकेचा निकाल चर्चेत! भाजपने 18 जागा जिंकल्या, मोहिते पाटील गटाला एकच जागा

Friday, 27 November 2026, 12:56

कुंजीरवाडी येथे पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

Friday, 27 November 2026, 12:06
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp