ए. बी. जोरी (कृषी पर्यवेक्षक)
Shirur News, शिरूर : मान्सुनपुर्व काळात पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग पहावयास मिळते. पेरणी योग्य पाऊस झाल्यावर पेरणीला सुरवात होईल. रोग व किंडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व बियाणांची उगवण क्षमता वाढवून पिकांच्या सतेज व जोरदार वाढीसाठी बिजप्रक्रिया करणे महत्वाचे असते. (Shirur News)
कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. साधारणतः २ ग्रॅम थायरम किंवा तीन ते चार ग्रॅम कारबेन्डेझिम प्रतीकिलो बियाणांस चोळावे. बुरशीनाशकाची प्रक्रिया करीत असताना हातामध्ये रबरी किंवा प्लस्टिकचे हातमोजे घालावेत. मोठ्या प्रमाणात बियाणे प्रक्रिया करण्यासाठी ड्रमचा देखील वापर करता येतो.
बियाणांस सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी, त्यानंतर तीन ते चार तासांनी जैविक खते जसे रायझोबिय, आॅझोटोबॅक्टर इत्यादिची प्रक्रिया करावी. व सर्वात शेवटी स्फूरद विरघळविण्याऱ्या जिवाणूची ( २५० ग्रॅम जिवाणू संवर्धन प्रति १० किलो बियाणे ) या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
जैविक बुरशिनाशक ट्रायकोडर्मा १.५० टक्के भुकटी२० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. बीजप्रक्रिया नंतर बियाणे सावलीत सुकवावे व बियाणांची २४ तासाच पेरणी करावी. जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करण्यापुर्वी जर बियाण्यास कीटकनाशके पिकांसाठी विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटातील जिवाणू खतच वापरावे.
पिकांच्या सशक्त व निरोगी वाढीसाठी तसेच पीक संरक्षण आणि खतांवरील उत्पादन खर्चात बचत होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच बियाण्यांची पेरणी करावी.
शब्दाकंन युनूस तांबोळी