स्वाती दौंडकर
(प्राथमिक शिक्षिका, जातेगाव बुद्रुक ता. शिरूर )
शिरूर Shirur News : वेळ सकाळची होती… मुलांना सुट्टी असल्याने गावाकडे आई, मावशी, मामा यांच्याकडे गेलो होतो. मुलांना विरंगुळा मिळावा यासाठी काही ना काही तरी भटकंती करण्याचा विचार होता. (Shirur News) त्यामुळेच आम्ही सारे खेड तालुक्यातील कन्हेरसरच्या श्री येमाई मातेच्या दर्शनासाठी गेलो. (Shirur News) गाडी पार्किंगमध्ये लावून मुलांसमवेत सगळेच मंदिरातील गेटवरून आत प्रवेश केला. (Shirur News) सभोवताल असणारी झाडी अन वंसत ऋतूची चाहुल लागल्याने वेगवेगळ्या झाडांवर नवीन पालवी फुटल्याने त्यांच नवचैतन्य रूप पहावयास मिळत होत. (Shirur News)
‘चला सगळेजण एक मस्त फोटो काढूयात’
देवदर्शना अगोदरच ‘ चला सगळेजण एक मस्त फोटो काढूयात ‘ असे मी म्हटल्यावर माझ्या मुलाने तर वयोवृद्ध आजीला तातडीने रांगेत उभे केले. मी मामा, मावशीना जवळजवळ उभे राहण्याचा आग्रह केला. फोटोसेशन झाले अन मी तो फोटो लगेचच मोबाईलच्या स्टेटस वर ठेवलाही. सगळेजण मंदिरात दर्शन करायला गेले होते. पण मी मात्र फोटोत वयोवृद्धांच्या चेहऱ्यांवरील सुरकत्यातून निखळ वाहणारा आनंद पहात होते. त्यांचा तो आनंद अगदी मन हेलावून टाकणारा होता.
तेवढ्यात माझ्या मामे बहिन साधना पिंगळे चा फोन आला. काय ग… !, कुठे फिरतीया ? म्हताऱ्या कोतऱ्यां मध्ये फिरतीया. अग लय मजा येते या वयोवृद्धां बरोबर. आपल्या बिगर कोण हाय त्यांना या वयात फेरफटका मारायला नेणार. मी तिला त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदा बाबत बोलून गेले.
तू येतेस का? तुलाही नेते फिरायला…जाऊ कोकण ट्रिपच काढू ना. म्हतारपणात त्यांना ही कळू दे सहल काय असते ते…, असे म्हटल्यावर ती ने ही होकार दिला. अन नातेवाईकांमधील वयोवृद्धां बरोबर ट्रिप काढण्याचे ठरले. यामध्ये कोणाचे नवरे किंवा बायका घ्यायच्या नाही. असेही ठरले. सुंगधीत धुप, फुले अन अगरबत्तीचा सुवास मंदिरात दरवळत होता. दर्शन करून येणाऱ्या जाणाऱ्याची लगबग सुरू होती. मी दर्शन करून झाल्यावर वयोवृद्धांसाठी एक उपक्रम करण्याचे ठरविले याचे समाधान घेऊन मंदिरातून बाहेर पडले होते.
वयोवृद्धांच्या सहलीची तारीख व ठिकाण ठरले. त्या बरोबर प्रवासाची दिशा अन वाहन ठरविण्यात आले होते. सहल निघाली खरी पण यामध्ये अनेक प्रश्न व समस्या पुढे आल्या होत्या. वयस्कर मंडळी येतील का? त्यांना प्रवास जमेल का? उलटीचा त्रास होणारे त्यात काहीजण होते. समस्यांवर मात करायची पण सहल पुर्ण करायची हे मनोमन ठरविले होते.
त्यानूसार सगळे नियोजन झाले. प्रवासासाठी गाडी सज्ज झाली अन सगळेच वयोवृद्ध नातेवाईक पटपट गाडीत बसू लागले. आलेले वयोवृद्ध पाहून मलाही आश्चर्य वाटले. या वयात निसर्गाच्या सानिध्यात त्यांना समाधान मिळणार होते. कोणीतरी आपल्याला आधार देत सहलीचा आनंद मिळवून देतय याच समाधान असल्याने जो तो आपली शिटवर बसला होता. येथेच मी वयोवृद्धांची सहल काढण्यात जिंकले होते.
उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने मुलांना आजी आजोबां बरोबर फिरायला खेळायला मिळणार होते. त्यामुळे सगळेच जण अगदी आनंदी होते.ठरल्याप्रमाने अक्षयतृतीया (२०२३) च्या मुहर्तावर कोकण, दिवेआगर या परिसरात आमची वयोवृद्धांची सहल निघाली. अगदी जुन्या पद्धतीपासून ते हल्लीच्या नव्या चालीवरची गाणी गाऊन आनंदाने हा सहलीचा सोहळा निघाला होता. कोकणातल निसर्ग सौदर्य पाहून ही वयोवृद्ध मंडळी अगदी भारावून गेली होती.
कुठे माकड तर पक्षांचा आवाज ऐकायला मिळत होता. दिवेआगारला गेल्यावर समुद्राच्या पाण्याची चव, लाटेचा दुरवर येणारा आवाज पहिल्यांदाच अनुभवल्याने सगळे कसे मनोमनी समाधानी होते. वाळूवरचा खेळ अन सर्व नातेवाईकांसोबत केलेल वनभोजन याचा आस्वाद सगळ्यांनीच घेतला. म्हतारपणात पायाची दुखणी पण मुलांनी तर आनंदाने आजीला पाठीवर घेऊन ही कोकणची सहल केली.
या वयात मुलांनी आपल्या आजी सोबत मारलेल्या गप्पा आणि खेळातल्या गंमतीजमती त्या बरोबर लाटेच्या पाण्याचा येणारा मारा अनुभवला होता. म्हतारपणी दुखण्याने कण्हणारी आजी कासोट्याच्या साडीवर वाळूवर खेळ खेळूयात असेही सांगत होती. वय झाल पण निसर्गातल सौंदर्य फक्त ऐकव्यात होते. कोकणात नारळ फुकट मिळतो असे म्हणतात. पण येथेही नारळ महाग आहे. असेही एक आज्जी आपल्या नातवाला सांगत होती.
दोन दिवसाच्या या प्रवासात देवदर्शन आणि समुद्राचा अनुभव घेत गाडी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागली. पण या प्रवासात कोणीही दुखण्याची तक्रार केली नाही. उलट आयोजकाचे आभार मानत होते. पुढच्या वर्षी पुन्हा आमच्यासाठी अशीच सहल काढा. असे ही सांगत होते. पण आयु्ष्याच्या चक्रात किती दिवस जगणार…जगलो वाचलो तर पुन्हा सहलीला येऊ असे सांगत डोळ्यात अश्रु आणणारे समाधानी वयोवृद्ध पहावयास मिळाले. पण या सुट्टीतच निसर्गातल म्हतारपण मी अनुभवल होत. मुलांसमवेत आजी आजोबांची ही अनोखी सहल माझ्या स्मरणात राहिली होती. पुढच्या वर्षी सगळे नक्की सहलीला जाऊ असा निर्धार करत मी त्यांच्या आयुष्याच बळ वाढवल होत. याच समाधान मनाला मिळाल होत.
शब्दाकंन : युनूस तांबोळी कवठे येमाई
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News | लोकसहभाग आणि नाम फाऊंडेशन करणार पाणीदार गाव ; ओढा खोलीकरण व ४२ तलावांची निर्मिती…