योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : दोन विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची धक्कादायक घटना सविंदणे (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता.२१) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
मिळालेल्या माहितीनुसार, सविंदणे हद्दीतील कॅनल जवळ ओढ्याच्या शेजारी असलेल्या हाडवळा येथील रात्रीच्या सुमारास विद्युत रोहित्र चोरी झाले आहे. सविंदणे गावात विद्युत रोहित चोरी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, (Shirur News) त्या मुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील महिन्या पूर्वी गावठाण पाणीपुरवठा व कामठेवाडी, डोंगरभाग पिराचामाळ या ठिकाणी पाणीपुरवठा होणाऱ्या विहिरी असून सदर दोन्ही विहिरींचे विद्युत कनेक्शन असून त्याचे ट्रान्सफार्मर चोरी झाले होते.
दरम्यान, चांडोह परिसरातील घोड नदी येथे असलेल्या ६/७ शेतकऱ्यांच्या विदुयत मोटारींच्या महागड्या केबलची चोरी झाली होती . (Shirur News) एकुणच बेट भागात विदयुत रोहीत्र, केबल, विदयुत मोटार चोरण्याचा धुमाकुळ चोरट्यांनी घातला असून शिरूर पोलिसांनी या चोरट्याचा बंदोबस्त केल्या पाहिजे स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : बाजार समितीसह शेतकऱ्यांच्या समस्याही सोडवणार; भाजपच्या जयेश शिंदे यांची ग्वाही