युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : कुलदैवत खंडेरायाचे हेमांड पद्धतीचे मंदिर उभारत असताना त्याची स्वच्छता व पावीत्र राखण्याचे काम करण्यात यावे. त्या पाठोपाठ मुलांना उच्च पदवी पर्यंतचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. बेरोजगार तरूणांना व्यवसाय कौशल्य देऊन त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. गावागावात ग्रामस्थांनी अशी व्यवसाय कौशल्य केंद्र उभारावी. गावाच्या एकोप्यातून गावाचा विकास होत असतो. असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
जांबूत येथे श्री मार्तंड खंडेराय मंदिराचे भूमिपूजन
जांबूत ( ता. शिरूर ) येथे श्री मार्तंड खंडेराय मंदिराच्या भुमीपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते.(Shirur News) यावेळी भिमाशंकर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंग पवार, घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील पराटे. राष्ट्रवादी कॅाग्रेस चे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, मंगलदास बांदल, सतिष महाराज काळजे, शशिकांत पेठे, संदिप पेठे, सावीत्रा थोरात, पंचायत समितीचे माजी सदस्य वासुदेव जोरी, बाळासाहेब फिरोदिया, बाळकृष्ण कड, बाबा फिरोदिया, पोपट फिरोदिया, सरपंच दत्तात्रेय जोरी, नाथा जोरी, बाळासाहेब बदर, बाळासाहेब पठारे, बिपीन थिटे, आनंद शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वळसे पाटिल म्हणाले की, राज्यात नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगारीची संख्या वाढत चालली आहे. तरूणांना हाताला काम मिळत नसल्ने त्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. (Shirur News) तरूणांना, महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गावातील नागरिकांनी घेतली पाहिजे.
फराटे म्हणाले की, मंदिराची उभारणी ही दोन ते तीन पिढ्यांनंतरच पवीत्र कार्य आहे. ग्रामदैवत, कुलदैवत यांचे मंदिर उभारणी म्हणजे जांबूत गावातील नागरिकांसाठी आलेले पुण्य पवीत्र कार्य आहे. (Shirur News) हे काम सुरू झाल्यावर कधी थांबत नसते. फक्त गावच संघटन कौशल्य मजबूत असणे गरजेचे आहे.
दरम्यान, या मंदिराच्या उभारणीसाठी शासनाकडून २४ लाख रूपये निधी देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून जवळपास ३ कोटी रूपयांचे हेंमाड पद्धतीचे भव्य कुलदैवत खंडेराया मंदिर उभे राहणार आहे. (Shirur News) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लहु गाजरे, सुनिल जाधव यांनी केले. तर आभार राहुल जगताप यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूर बेट भागातील डीपी चोरी करणारी टोळी अटकेत ; शिरूर पोलिसांची मोठी कारवाई..
Shirur News : शालेय मुलीच्या दुचाकी ला अवजड वाहनाने धडक दिल्याने अपघाती मृत्यू;
Shirur News : आदेश गारगोटे, जयश्री भुजबळ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान