Shirur News : पुणे : भरजरी कपड्यातील सहा फूट उंचीच्या श्री गणेश मूर्तीची मिरवणूक… विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना… श्री गणेशाची आरती… फुले व धूप, उदबत्तीचा सुंगध… आकर्षक विद्युत रोषणाई… अशा मंगलमय वातावरणाने सारा परिसर उजळून निघाला होता. त्यानंतर विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, नाम गाऊ नाम घेऊ… नाम विठोबाला वाहू, या भजनापाठोपाठ राधे तुला, राधे तुला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला… या गवळणीने नवज्योत तरूण मित्र मंडळाचा गणेशोत्सवाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.
कवठे येमाई परिसरात गणेशोत्सवाचा जल्लोष!
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे नवज्योत तरूण मित्र मंडळाचा गणेशोत्सव मिरवणुकीने मोठ्या उत्साहात सुरू झाला. पहिल्या दिवशी श्री गणेशाची स्वागत मिरवणूक काढली होती. (Shirur News) त्यानंतर श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री गणेशाची आरती झाल्यावर स्वयंभू मित्र मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्याचाच एक भाग म्हणून आजही ती प्रथा नवज्योत तरूण मित्र मंडळाने सुरू ठेवली आहे. .
श्री सांप्रदाय भजनी मंडळ व सोमेश्वर भजनी मंडळाने भजन सादर केले. यामध्ये मिना रोकडे, अर्चना उघडे, चित्रंजन उघडे, अशोक गोसवी, दादाभाऊ पंचरास, प्रकाश साठे, रामचंद्र साळवे, शरद कदम, अरूण रोकडे, विनोद उघडे, बबन शिंदे, पप्पू पंचरास यांनी सहभाग घेतला. दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. मंडळाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. (Shirur News) गावच्या विकासकामांबरोबरच आरोग्य, स्वच्छता, दातृत्व यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या मंडळाची विसर्जन मिरवणूक ही नेहमी आकर्षक ठरते. त्यामुळे ही मिरवणूक पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात.
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे फ्रेंडशिप मित्र मंडळ, नवज्योत मित्र मंडळ, पिरसाहेब मित्र मंडळ, राजग्रूप मित्र मंडळ तसेच वाडी-0वस्तीवरील सर्व प्रमुख गणेश मंडळांनी श्री गणरायाचे स्वागत पारंपरिक वाद्याने केले. श्रींच्या मूर्तीची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना करत जयजयकार केला. (Shirur News) या सर्व मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना ग्राम पुरोहित फक्कड जोशी यांच्या मंत्रोच्चारात करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत, सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. चांगला पाऊस पडू दे… हीच अपेक्षा बळीराजाने बाप्पाकडे व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पाबळ येथील जिजाबाई थिटे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
Shirur News : शिरूर तालुक्यातील तलाठ्यांच्या गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गांभीर्याने दखल
Shirur News : रांजणगावात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना बेड्या