युनूस तांबोळी
Shirur News : -पुणे : शारदीय नवरात्रोत्सवात शिरूर तालुक्यातील कुलस्वामिनी व कुलदैवत असणाऱ्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ‘आई उदे गं अंबे उदे’च्या गजराने मंदिर परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघत आहे. नवरात्रीच्या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यातून भाविक मोठ्या संख्येने या कुलदैवतांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
‘आई उदे गं अंबे उदे’च्या गजरात, अष्टमीला जगदंबेला हजारो भाविक नतमस्तक
कुलदैवतांच्या मंदिरात रविवारी (ता. २२) होमहवन झाला. त्यानिमित्त हजारो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले. कवठे येमाई (ता. शिरूर) येथील श्री येमाई देवीच्या मंदिरात विद्युत रोषणाई व फुलांनी मंदिर परिसर सजविण्यात आला होता. नवरात्र व घटस्थापना झाल्यापासून याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (Shirur News) कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील श्री मेसाई देवी मंदिरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. घटस्थापनेपासून येथे भाविकांची गर्दी पहावयास मिळाली.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील कुकडी नदी किनारी असणारा श्री मळगंगा देवी परिसर विद्युत रोषणाई व फुलांनी सजविण्यात आला होती. जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड पर्यटनस्थळ या ठिकाणी असल्याने नवरात्रात पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसतात.
वडगाव रासई (ता. शिरूर) येथील श्री रासाई देवी मंदिरात विद्युत रोषणाई व मंदिर परिसर सजविण्यात आला होता. विविध धार्मिक कार्यक्रम नवरात्रीत पार पडले.
या चारही मंदिरांना पुरातन काळापासून महत्त्व आहे. (Shirur News) कुलस्वामिनी व कुलदैवत असल्याने या ठिकाणी राज्यातून भाविक नवरात्रोत्सवात गर्दी करताना दिसतात. नवरात्रीला सुरवात झाल्यापासून मंदिरात भाविकांची रिघ लागलेली असते. रविवार (ता. २२) अष्टमीला होमहवन झाला. विधीवत कार्यक्रम पार पडला.
यासाठी राज्यातून भाविकांनी गर्दी करत रात्र जागवली. नवरात्रीत गावापासून दूर असणाऱ्या मंदिरात पहाटे चारपासून पायी भाविक दर्शनासाठी येत असतात. (Shirur News) यात महिलांची संख्या अधिक असते. या उत्सवासाठी मंदिर परिसरात पूजा साहित्यासह विविध खेळणी, खाद्य पदार्थ विक्रेते, संसार उपयोगी साहित्य विक्रेते, शितपेय विक्रेते, पाळणे आदी व्यवसायिक आपली दुकाने थाटतात. यातून मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : प्रा. संजय देशमुख यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
Shirur News : कोरेगाव भीमात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी