Shirur News : स्त्री हीच नेहमी भावनाविवश दुसऱ्याच दुखः समजून घेणारी असते. समाजात मन हेलवणाऱ्या घटना घटतात. त्यातून अनेकजण पोरके होतात. महिलांना, मुलांना, जेष्ठांना भुतकाळ विसरून भविष्याच्या चिंतेत वर्तमान दुखावत असतो. अशा वेळी आपल अस कोणी जवळ नसत आणी असल तरी कोणी जवळ करत नाही. तेव्हा मात्र समाजातील कुणी तरी या दुखावलेल्या चेहऱ्यांना आधार देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाच हास्य येण्यासाठी मायेचा हात फिरवतो. अशा दुबळ्यांचा आधार होणे तेवढ सोप नाही. पण वढु बुद्रुक ( ता. शिरूर ) येथील माहेर संस्थेचा संस्थापिका व समाज सेवीका ‘लुसी कुरियन’ या दुबळ्यांचे आसू पुसण्यासाठी आधार बनतात. उद्योग, शिक्षण, आरोग्य आणी समाजहित जोपासण्याचे धडे दिले जातात. त्यावेळी त्यांच्या कार्यातून नवरात्रीतल्या त्या ‘नवदुर्गा’ दिसू लागतात.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार या 7 राज्यात संस्थेचे कार्य चालू
शिरूर तालुक्यातील वढु बुद्रुक येथे माहेर संस्थेची स्थापना सिस्टर लूसी कुरियन यांनी 2 फेब्रुवारी 1997 रोजी केली. पुणे जिल्ह्यातील 8 गावे, महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, नवी मुंबई, वर्धा याजिल्ह्यांमध्ये तर भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार या 7 राज्यात संस्थेचे समाज विकासाची कार्य चालू आहेत. (Shirur News) माहेर संस्था संचालित 25 प्रकल्प असून, 68 घराच्या माध्यमातून समस्याग्रस्थ, विधिग्रस्त, विधवा,परितक्ता, मानसिक आजारी, वृद्ध महिला, पुरुष निराधार, विधीग्रस्त, एकल पालकत्व, आर्थिक दृष्ट्या दुर्बलघटक, असाध्य रोगाने ग्रासलेले पालक यांच्या मुलांसाठी संस्था काम करीत आहेत.
सध्या संस्थेमध्ये 611 महिला 21 घराच्या माध्यमातून आश्रयास आहेत. तसेच 35 घराच्या माध्यमातून 880 मुलं संस्थेमध्ये लाभ घेत आहे. आतापर्यंत 185 मुलींचे तर 17 मुलांचे लग्न करून दिली आहेत. पुरुषांचे एकूण 9 घर असून त्यामध्ये 249 लाभार्थी लाभ घेत आहे. संस्था संचालित ग्रामीण भागामध्ये 5 बालवड्या, 10 अभ्यासिका वर्गाच्या माध्यमातून संस्था कामकाज करीत आहे. (Shirur News) तीन गंमत शाळेचे माध्यमातून 85 विद्यार्थी लाभ घेत आहे. संस्था संचालित स्वावलंबन प्रकल्पांतर्गत 1308 बचत गट असून यामध्ये महिला, पुरुष, मिश्रगट असे बचत गटाचे स्वरूप आहे. यामध्ये साधारणता 10305 महिला, पुरुष बचत गटाच्या माध्यमातून बचत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून कामकाज करीत आहे.
गेली 25 वर्षे सर्व धर्म समभाव आणी प्रेम हाच आमचा धर्म आहे. वसुधैव कुटूम्बकम या पद्धतीने निराधाराचा त्या संभाळ करत आहेत. ही संस्था म्हणजे मायेचा झरा आहे. पिडीतांना व्यवसायाचे धडे देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचे कार्य केले जाते. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून समाजात सुसंस्कृत घडविण्याचे काम करतात. मुलींना शिक्षणाबरोबर वेगवेगळे शिक्षण देण्याचे काम करतात. सर्व स्तरातील निराधार त्यांच्याकडे आल्यावर त्याला आधार मिळतो. त्यातून त्याची भविष्याची चिंता दूर होण्यास मदत होते.
दरम्यान, यशवंतराव होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांना यशवंतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना 273आंतरराष्टीय, राष्ट्रीय तसेच विविध नामांकित शासकीय निमशासकीय संस्थांनी सन्मानित केले आहे.
माणसाने समाजहित जोपासताना प्रत्येक माणूस हा आपल्या कुटूंबाचा हिस्सा आहे. असे समजले पाहिजे. धर्मापेक्षा प्रेमाला अधिक महत्व दिले पाहिजे. निराधारांना आधार मिळाला की त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे हास्य अधिक सुख देत असते. (Shirur News) ऐन तारूण्यात कोमजणारा तरूण वर्ग आधार मिळाला नाही की गुन्हेगारी विश्वात हरवून जातो. पालकांनी देखील मुलांना सुसंस्कृत शिक्षण देत असताना मुल व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत. याकडे लक्ष दिले पाहिजे.
लुसी कुरियन (संस्थापिका – माहेर संस्था)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : बाजार समितीसह शेतकऱ्यांच्या समस्याही सोडवणार; भाजपच्या जयेश शिंदे यांची ग्वाही