युनूस तांबोळी
शिरूर- Shirur News : शिरूर कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे जांबूत ( ता. शिरूर ) (Shirur News) येथील अरूण जोरी हे कृषी पर्यवेक्षक परीक्षेत जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. (Shirur News) त्यांच्या या यशामुळे शिरूर तालुका कृषी विभाग व परिसरातील ग्रामस्थ अभीनंदन करू लागले आहेत. कृषी विभागात शिरूर (Shirur News) तालुक्यातून प्रथमच प्रथम क्रमांकाचा मान त्यांनी पटकावला आहे.
शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
कृषी विभागासाठी घेण्यात आलेल्या कृषी पर्यवेक्षक या परीक्षेमधून पुणे विभागात एकूण ११२ जागांसाठी तर राज्यात एकूण ७५९ जागांसाठी (दि.३) एप्रिल रोजी हि परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल (दि. २१) एप्रिल रोजी नुकताच जाहीर झाला आहे. पुणे केंद्रात हि परीक्षा घेण्यात आल्याचे जोरी यांनी सांगितले. कृषी सहाय्यक अरूण भागाजी जोरी यांनी नुकत्याच आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या कृषीपर्यवेक्षक पदासाठी ही परीक्षा दिली होती. मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी मोठे यश संपादन केले आहे.
जोरी हे मुळचे जांबूत (ता.शिरूर) येथील रहिवाशी आहेत. शिरूर तालुक्यात वेगवेगळ्या गावात त्यांनी या पदाचा पदभार स्विकारला आहे. कृषी सहाय्यक म्हणून याआधीच्या काळात महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबवली आहे. नैसर्गीक आपत्ती काळात शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम केले आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे.
माती परिक्षण, उत्कृष्ट बियाणे व त्याची लागवड या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. कांदा उत्पादन, कांदा चाळीतून साठवण करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा चाळी उभारणी करण्यात आल्या आहेत. विहीर पुर्नभरण, तलाव, बंधारे यासाठी असणाऱ्या योजनांमधून शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली आहे.
बांधावर जाऊन लागवड, पिकाची काढणी, प्रतवारी, बाजारभाव, योग्य बाजारपेठ यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. पिकांवरील वेगवेगळ्या रोगाची माहिती त्या बरोबर या रोगावर उपलब्ध औषधे यांची माहिती शेतकऱ्यांना सतर्कतेने देत आले आहेत. फळ बागांवरील पाणि व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाय व योग्य बाजारपेठेसाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. त्यातून शिरूर तालुक्याच्या बेट भागात त्यांच्या मार्गदर्शनाला अधिक मागणि आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अगदी जवळचे कृषी सहाय्यक म्हणून त्यांची औळख आहे.
दरम्यान, अरूण जोरी यांचे माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur | शिरूर तालुक्यातील पती-पत्नीनंतर आता भाऊ-बहिण एकाचवेळी झाले पोलीस दलात भरती…!