बापू जाधव
Shirur News : निमोणे : मातंग नवनिर्माण सेनेचे राज्य अध्यक्ष म्हस्कू आण्णा शेंडगे यांना जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये यवत परिसरातील गावगुंडानी पोलिस अधिकाऱ्यांसमोर दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याच्या निषेधार्थ शिरुर तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने शिरुर पोलिस निरिक्षक संजय जगताप यांना निवेदन देण्यात आले.
शिरुर पोलिसांना निवेदन
निवेदनात म्हस्कू आण्णा शेंडगे हे मातंग नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात काम करत आहेत. पुरंदर तालुक्यातील माळशिरस परिसरातील भुलेश्वर मंदिरात धार्मिक विधी करणाऱ्या पुजाऱ्याला गावगुंडांनी मारहाण केली होती. जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये या विषयावर शेंडगे पोलिस अधिकाऱ्यांशी बोलत असताना संशयित गावगुंड पोलिस स्टेशनमध्ये आले व शेंडगे यांच्याशी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करु लागले.(Shirur News) त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेचा सकल मातंग समाज तीव्र निषेध करत असून, संशयित गावगुंड हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याने शेंडगे यांना पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिस निरिक्षक शेंडगे यांच्याकडे केली आहे. तसेच समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या शेंडगे यांच्यावरच गावगुंडाच्या सांगण्यावरुन खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे राज्याचे सचिव लक्ष्मण मांढरे, जिल्हाध्यक्ष रोहिणी शेंडगे, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महादेव जाधव, दादाभाऊ लोखंडे अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष दादाभाऊ लोंखडे, लहूजी शक्ती सेना तालुका माजी अध्यक्ष दत्ता साळवे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अनिल जाधव, शशिकांत शेंडगे, आकाश मदने आदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : बाप्पांची विधीवत पूजा, आरती, धूप, उदबत्तीचा सुगंध अन् आकर्षक विद्युत रोषणाई…
Shirur News : पाबळ येथील जिजाबाई थिटे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान