Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : काश्मीर ते कन्याकुमारी 3700 किमीचा प्रवास सायकलवरून करत ‘एमआयटी ए़डीटी’चा व्यसनमुक्तीचा संदेश

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 20 September 2023, 18:26

Loni Kalbhor : लोणी काळभोर  : आपल्यात उत्साह ध्यास आणि जगात बदल घडविण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. हे लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील रोविंगचे राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप भापकर यांनी सिद्ध केले. भापकर यांनी विद्यार्थी साईकोंडाला सोबत घेत आशिया खंडातील सर्वांत लांब मार्ग असणाऱ्या काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास सायकलने पूर्ण करताना व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. यासह त्यांनी हा ३७०० किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर अवघ्या १४ दिवसांत पूर्ण करण्याची किमया साधली आहे.

३७०० किलोमीटरचे अंतर अवघ्या १४ दिवसांत केले पार

काश्मिरमधील प्रसिद्ध लाल चौकातून १९ तारखेला सुरु झालेल्या प्रवासात १० राज्ये, १ केंद्रशाशित प्रदेश पार करत व सायकल पंक्चर होणे, काश्मिरमधील सैन्याचे विविध चेकपोस्ट, उन्हामुळे होणारे सनबर्न अशी आव्हाने पार करत संदीप व साईकोंडा यांनी तिरंग्यासह ‘एमआयटी एडीटी’चा झेंडा कन्याकुमारीत ८ सप्टेंबर रोजी फडकाविला. या सायकलवारीतून तंबाखू, दारू, सिगारेटच्या व्यसनांपेक्षा सायकल चालविण्याचे व्यसन शारीरिक तंदुरूस्तीसाठी किती चांगले आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. (Loni Kalbhor) त्यांच्या या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनिता कराड, प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. सुरेश भुयार, प्रा.पद्माकर फड यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

संदीप भापकर हे विद्यापीठात रोईंग या क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षक आहेत. या खेळात हातातील व पायातील ताकदीचा खऱ्या अर्थाने कस लागतो. तीच ताकद वाढविण्यासाठी (इंन्डूरन्स) संदीप यांनी सायकलिंगला सुरुवात केली. त्याचा प्रारंभ, जेजरी, सिंहगड, पंढरपूरची वारी व नंतर गोवा अशा स्थानिक ठिकाणांना भेट देत केला. नंतर त्यांनी पुणे ते कन्याकुमारी हे १६०० किमींचे अंतर देखील पार केले. आता वेध लागले होते ते आशियातील सर्वांत लांब मार्ग काश्मिर ते कन्याकुमारीच्या वारीचे! (Loni Kalbhor) अखेर योजना ठरली. त्यानुसार, स्वातंतत्र्यदिनी आपल्या सायकल बॉक्समध्ये पॅक करून दोघांनी झेलम एक्सप्रेसने पुणे सोडले.

जम्मू गाठल्यानंतर तेथून लाल चौक, श्रीनगरपर्यंतच्या प्रवासात वातावरणाशी जुळवून घेण्यासोबतच सैन्याचे अनेक चेक पोस्ट त्यांनी पार केले. लाल चौकातून प्रवास सुरु करून रोज २०० ते २२० किमीपर्यंत सायकल चालवत, बदलणाऱ्या प्रदेशांसोबतच, बदलणारी माणसे, त्यांची भाषा, खाद्यपदार्थ, राहणीमान, ऐतिहासिक पानीपथ, आग्र्याचा लाल किल्ला अशी ठिकाणे पाहत विक्रमी वेळेत दोघांनीही भारताचे शेवटचे टोक कन्याकुमारी गाठले.

 

सायकल हेच आमचं व्यसन

मध्य प्रदेशमधून जात असताना तोंडात तंबाखूचा माल भरलेल्या व्यक्तीने आम्हाला ‘आधुनिक साधने असताना सायकलच का? व हे सर्व कशासाठी?’ असा प्रश्न विचारला. त्यावर, ‘जसे तुम्हाला तंबाखूचे व्यसन आहे, तसेच सायकल चालवणे हे आमचे व्यसन आहे. (Loni Kalbhor) फक्त फरक एवढाच की, ते तुमचे आयुर्मान कमी करतंय तर आम्ही आमचे वाढवतोय,’ असे उत्तर दिल्याची आठवण संदीप यांनी सांगितली.

आता भारताबाहेर प्रवास करायचाय

हा प्रवास अनेक अनुभवांनी समृद्ध करणारा होता. ज्यात विविधतेने नटलेल्या भारताचे अद्भुत दर्शन घडले. यातून आम्ही व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. (Loni Kalbhor) हा सर्व प्रवास एमआयटी एडीटी विद्यापीठाने दिलेल्या मानसिक, आर्थिक पाठबळाशिवाय शक्य नव्हता. यानंतर भारताच्या नकाशाच्या बाह्यरेषेचा प्रवास करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

– संदीप भापकर, राष्ट्रीय प्रशिक्षक रोईंग.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठामध्ये इको-फ्रेंडली गणपती बनविण्याची कार्यशाळा ; विद्यार्थ्यांनी केला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ‘वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे’ मोठ्या उत्साहात साजरा

Loni Kalbhor News : …तर पुढील काळात मंत्रालयात मेंढ्या सोडणार ; लोणी काळभोर येथे धनगर समाज युवक संघाचा इशारा..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54
Next Post

Shirur News : गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हा दाखल करा; सकल मातंग समाजाची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp