Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात राखेतून उभारणार महामार्ग! 6.17 कोटी मेट्रिक टनचा करार; काय आहे सरकारचा मेगा प्लॅन?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 October 2026, 15:32

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते विकासाला गती देण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील प्रमुख द्रुतगती महामार्गांच्या बांधकामासाठी आता औष्णिक विद्युत प्रकल्पांमधून निघणाऱ्या उडणाऱ्या राखेचा (फ्लाय ॲश) मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे.यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि महानिर्मिती (Mahagenco) यांच्यात एक विशेष सामंजस्य करार पूर्ण झाला आहे. राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मुख्य उपस्थितीत या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

या करारानुसार एकूण 6.17 कोटी मेट्रिक टन राखेचा वापर विविध पायाभूत सुविधांच्या आणि महामार्गांच्या उभारणीसाठी होणार आहे. MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, महानिर्मितीचे संचालक अभय हरणे, कार्यकारी संचालक डॉ. नितीन वाघ आणि महाव्यवस्थापक नरेंद्र टोके या मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकल्प निश्चित करण्यात आला. महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्रांमधून हा कच्चा माल उपलब्ध करून दिला जाईल.

प्रकल्पनिहाय राखेचे वितरण:

नागपूर – गोंदिया द्रुतगती मार्ग: 2.09 कोटी मेट्रिक टन

 

नागपूर – चंद्रपूर द्रुतगती मार्ग: 2.79 कोटी मेट्रिक टन

भंडारा – गडचिरोली द्रुतगती मार्ग: 1.14 कोटी मेट्रिक टन

नवेगाव मोरे – सुरजागड खनिज मार्ग: 0.15 कोटी मेट्रिक टन

स्थानिक गरजेनुसार नागपूरजवळील रस्त्यांसाठी कोराडी आणि खापरखेडा केंद्रांतून, तर चंद्रपूर परिसरातील कामांसाठी चंद्रपूर वीज केंद्रातून राख पुरवली जाणार आहे.कामाचे वेळापत्रक, वाहतुकीचे नियोजन, राखेची उचल आणि आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी MSRDC, संबंधित औष्णिक केंद्र आणि कंत्राटदार यांच्यात स्वतंत्र त्रिपक्षीय करार केले जातील.

औष्णिक वीज निर्मितीतील कचऱ्याचा असा योग्य वापर केल्यामुळे केवळ महामार्गांची भक्कम पायाभरणी होणार नाही, तर कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटून निसर्गाचे संरक्षण होण्यासही मोठी मदत होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वसुलीसाठी नेलं अन् दोन दिवसांनी शेतकऱ्याचा मृतदेहच सापडला! खासगी फायनान्सच्या कार्यालयात नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 17:25

न्हावरेच्या सुनेचा सातासमुद्रापार डंका! जर्मनीतून पदव्युत्तर पदवी संपादन करत शरयू कांडगे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी!

Saturday, 24 October 2026, 17:09

सिस-पे घोटाळ्यात तळेगाव ढमढेरे येथील तलाठी दशरथ रोडे अखेर गुडघ्यावर,115 कोटींच्या मालमत्ता जप्तीला मंजुरी, आणखी 60 कोटींचा प्रस्ताव सादर

Saturday, 24 October 2026, 16:51

काटेवाडीत जातिवाचक शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 16:32

वाघोलीत गांजा सेवन करणाऱ्या चौघांवर कारवाई ; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

Saturday, 24 October 2026, 16:07

महामार्गावर अतिक्रमणांचा विळखा, प्रशासनाचे दुर्लक्ष! लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त

Saturday, 24 October 2026, 15:55
Next Post

४ वर्षांचं रिलेशनशिप, त्यानं तिच्यासाठी धर्म बदलला अन् ऐनवेळी गर्लफ्रेंड पलटली; रागाच्या भरात जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच तरुणानं सपासप वार करत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp