Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९४ पोलिसांना बाप्पांच्या आगमनादिवशीच मिळाली पदोन्नत्ती!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 20 September 2023, 18:50

पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९४ पोलिसांना बाप्पांच्या आगमनादिवशीच मिळाली पदोन्नत्ती! पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९४ पोलिसांना बाप्पांच्या आगमनादिवशीच पदोन्नत्ती मिळाली आहे. ३९० जणांना पोलीस शिपाई, नाईकपदावरुन हवालदार, तर चार अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी काढले आहेत. यामुळे गणरायाने आगमनादिवशीच ‘गोड’ प्रसाद दिल्याची भावना पेलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात गेली पाच वर्षांपासून मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. पोलीस शिपाई पदासाठी दोन वेळा भरती झाली. इतर जिल्ह्यांतून बदलीवर येणारे, पोलीस भरतीमधून मिळालेल्या पोलिसांना घेऊन कसाबसा गाडा हाकला जात आहे. विविध सण, अतिमहत्वाच्या नेत्यांच्या दौऱ्यावेळी आयुक्तालयाला बाहेरून अधिकची कुमक मागवावी लागते.

बंदोबस्तासह घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी देखील राखीव मनुष्यबळ ठेवावे लागते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी ३९४ जणांना बढती दिली. पोलीस दलात २५ मे २००४ पूर्वी रुजू झालेल्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार बढती मिळाली आहे. पोलीस शिपाई आणि नाईक पदावरून ३९० जणांना हवालदारपदी, तर पोलीस दलात ३० वर्षे सेवा पूर्ण करणारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर किमान तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या चार जणांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती दिली आहे.

 

मनोज बनसोड, ज्ञानेश्वर पोटे, वाहतूक शाखेतील गजेंद्र जाधवर आणि वाकड पोलीस ठाण्यातील अरुण भालेराव यांना ही बढती मिळाली आहे.पोलिसांना सर्वसाधारपणे एका पदावर दहा वर्षे सेवा कालावधी झाल्यानंतर पदोन्नती मिळते. पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्यांना पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी वयाच्या अडचणी येतात. त्यामुळे त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्णच राहते.

दरम्यान, पोलीस दलातील पदोन्नती साखळीतील पोलीस नाईक हे पद गृह विभागाने रद्द केले. सध्या कार्यरत असलेले पोलीस शिपाई, नाईक या दोन्ही संवर्गातील पोलिसांना हवालदार पदावर बढती दिली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Big Breaking News : हवेलीत महसूलचा 'गती'मान कारभार!.. तलाठ्याच्या चुकीची शेतकऱ्याला शिक्षा ; एका दिवसाच्या सातबारा दुरूस्तीसाठी ९० दिवस अन् १५ हेलपाटे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.